Akola News: दुर्दैवी! कुलरचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू, अकोल्यातील धक्कादायक घटना

Husband And Wife Due To Shock Of Cooler: अकोला पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या घटनेमुळे महान गावावर शोककळा पसरली आहे.
Akola News
Akola News Saam Tv
Published On: 

Akola Latest News: कुलरचा (Cooler) शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यामध्ये घडली आहे. अकोला जिल्ह्यातील महान याठिकाणी ही घटना घडली असून एकच खळबळ उडाली आहे. विजेच्या प्रवाहाच्या जोरदार झटक्यामुळे या पती-पत्नींचा जागीच मृत्यू झाला. अकोला पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या घटनेमुळे महान गावावर शोककळा पसरली आहे. या पती-पत्नींच्या पाश्चात कोणीच नाही.

Akola News
Satara News : दारूबंदी असलेल्या तालुक्यात धाड; १ लाख १५ हजाराची दारू जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, महान गावामध्ये ३० जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या गावामध्ये राहणाऱ्या प्रभाकर बापूराव जानोरकार (७० वर्षे) आणि त्यांची पत्नी निर्मला प्रभाकर जानोरकार (६५ वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रभाकर यांच्या घरामध्ये कुलरचा वापर फक्त हवेसाठी केला जात होता. या कुलरमध्ये ते पाणी टाकत नव्हते.

Akola News
Tourists Beaten in Nashik : धबधब्यावर मजा करायल गेले अन् सुजून आले, हुल्लडबाज पर्यटकांना सुरक्षारक्षकांची बेदम मारहाण

अशामध्ये ३० जुलै रोजी प्रभाकर हे शेतातून काम करुन घरी आले. त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा आतमधून बंद होता. त्यांनी दरवाजा वाजवला पण त्यांच्या पत्नीने दरवाजा काही उघडला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीतून घरामध्ये डोकावून पाहिले. त्यावेळी त्यांना त्यांची पत्नी कुलरजवळ पडल्याचे दिसले. त्यानंतर प्रभाकर यांनी आपल्या शेजारी राहणाऱ्या दोघांना मदतीसाठी बोलावून घेतले. त्यांनी त्यांना दरवाजा तोडण्यास सांगितला.

Akola News
Social Media त लाईव्ह करुन दांपत्याने उचललं टाेकाचे पाऊल, तहसीलदारांनी फेटाळले त्यांच्यावरील आराेप

पण दरवाजा उघडत नसल्यामुळे प्रभाकर यांनी शेवटी घराच्या मागच्या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केला. पत्नीला उचलण्यासाठी ते कुलरजवळ गेले. पण त्याचवेळी त्यांचा हात कुलरला लागला आणि त्यांना देखील जोरात विजेचा धक्का बसला. प्रभाकर यांनी जोरात आरडाओरडा केला. पण जोरदार विजेचा धक्का बसल्यामुळे ते कुलरला चिकटले. या दुर्घटनेमध्ये पत्नीसोबत प्रभाकर यांचा देखील मृत्यू झाला.

प्रभाकर आणि त्यांची पत्नी हे दोघे जण एकटेच राहत होते. त्यांना मुलं नव्हती. त्यांच्याकडे दोन एक्कर शेती होती. या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नामध्येच ते आपला उदरनिर्वाह करत होते. दोघांच्याही मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी महान पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.