शासकीय आश्रमातील भयंकर प्रकार उघड; ८ वर्षीय विद्यार्थ्याचा शौचालयाच्या टाकीत आढळला मृतदेह, नंदुरबार हादरलं

nandurbar news : शासकीय आश्रमातील भयंकर प्रकार उघड झाला आहे. ८ वर्षीय विद्यार्थ्याचा शौचालयाच्या टाकीत मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे.
nandurbar news
nandurbar newsSaam tv
Published On
Summary

आश्रम शाळेत ८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला.

मृतदेह शौचालयाच्या सेप्टिक टाकीत आढळल्याने उडाली खळबळ

पालकांनी संताप व्यक्त करत निषेध केला

सागर निकवाडे, साम टीव्ही

नंदुरबार पुन्हा चर्चेत आलं आहे. नंदूरबारच्या नवापूर तालुक्यातील बंधारे आश्रम शाळेतून भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. बंधारे आश्रम शाळेतील शौचालयाच्या सेप्टिक टाकीत एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्यानंतर पालकांनी एक आक्रोश व्यक्त केला.

नवापूरच्या शाळेत शिकणाऱ्या ८ वर्षीय राहुल गावित या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या शौचालयाच्या सेंटिंग सेप्टिक टाकीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

आठ वर्षीय राहुल हा अचानक बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

nandurbar news
Pune : पुण्यात बेपत्ता तरुणाचा मृतदेह तीन दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत सापडला; नेमकं काय प्रकरण?

मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला,असा सवाल करत संतप्त नातेवाईकांनी आणि पालकांनी शाळेबाहेर गर्दी केली आहे. कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आश्रम शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हा बळी गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.या संशयास्पद मृत्यूची नोंद करण्यात काम सुरू आहे.

नागपुरातही आढळला व्यावसायिकाचा मृतदेह

नागपुरातही व्यावसायिकाचा निर्वस्त्र मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. खडगाव मार्गावरील झुडपांत मृतदेह आढळल्यानंतर वाडीच्या लावा परिसरात खळबळ उडाली आहे. सुचित भोजापुरे (४४) असे मृतकाचे नाव आहे. ते मशिनरी स्पेअर पार्ट्स व्यवसायिक होते.

nandurbar news
Satara : साताऱ्यात शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर; मृतदेहांची झाली अदलाबदल, कुटुंबाकडून संताप

डोक्यावर जड वस्तूने वार करून निर्घृण हत्येची शक्यता व्यक्त केली जात आहे. निर्वस्त्र अवस्थेमुळे ओळख पटवणे कठीण झाले असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मृतदेह आढळलेल्या घटनास्थळी ठोस पुरावे नसून वाहनाचेही कोणतेही चिन्ह सापडले नाही. रात्रीपासून बेपत्ता होता, वाडी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती.

परंतु मृतदेहाचे छायाचित्र दाखवत ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला. सुचित यांच्या वडिलांचा थेट हत्येचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com