Pune : पुण्यात बेपत्ता तरुणाचा मृतदेह तीन दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत सापडला; नेमकं काय प्रकरण?

Pune Khed Crime News : पुण्यातील खेड तालुक्यात बेपत्ता असलेल्या ३३ वर्षीय तरुणाचा तीन दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला असून धारदार शस्त्राने हत्या झाल्याचा संशय आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.
Pune : पुण्यात बेपत्ता तरुणाचा मृतदेह तीन दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत सापडला; नेमकं काय प्रकरण?
Pune Khed Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • खेडमध्ये बेपत्ता तरुणाचा निर्घृण खून उघड

  • तीन दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

  • धारदार शस्त्राने हत्या केल्याचा संशय

  • पोलिसांकडून तपास सुरू

रोहिदास गाडगे, पुणे

Pune Khed Dhananjay Ghevde Murder Mystery पुण्यातील खेड तालुक्यातील जैदवाडी गावच्या हद्दीत एका ३३ वर्षीय तरुणाचा निघृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह तीन दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील धनंजय मारुती घेवडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय घेवडे हा १६ मार्च पासून बेपत्ता होता. त्यानंतर त्याचा शोध सुरू असतानाच जैदवाडी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्याच्या डोक्यावर व तोंडावर धारदार शस्त्राने घाव घालण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.घटनास्थळी सुकलेल्या रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला होता. तसेच मृतदेहाजवळ त्याची दुचाकीही आढळून आली आहे.

Pune : पुण्यात बेपत्ता तरुणाचा मृतदेह तीन दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत सापडला; नेमकं काय प्रकरण?
Nandurbar : मृत लिपिकाच्या नावे बनावट व्हाऊचर तयार केले, खोट्या स्वाक्षरीही केल्या; लाखोंचा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना बेड्या

या घटनेवरून ही हत्या अत्यंत नियोजनपूर्वक आणि क्रूरपणे करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मात्र, अद्याप हत्येमागे कोण आहे आणि खुनामागील नेमके कारण काय आहे, हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, बेपत्ता असलेल्या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com