अशोक खरातविरोधात आणखी एक गंभीर आरोप समोर
बीड कनेक्शनचा धक्कादायक खुलासा पत्रातून करण्यात आलाय
महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आलेत
योगेश काशिद, साम टीव्ही
भोंदू अशोक खरातचे एकापाठोपाठ भयंकर कारनामे समोर येऊ लागले आहेत. शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचे बीड कनेक्शन देखील उघड झालं आहे. भोंदू खरातकडे बीडच्या महिलांना पुत्र प्राप्तीसाठी पाठवले जायचे, असा गंभीर दावा पत्रातून करण्यात आला आहे. पत्रातील दाव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अशोक खरातची कसून चौकशी करत कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शरद पवार गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी केली आहे.
नाशिकच्या भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन समोर आल्याने बीडमध्ये खळबळ उडाली आहे . अशोक खरातच्या या कारनाम्याची कसून चौकशी करावी, अशी मागणी शरद पवार गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांन केली आहे. महिला आयोगाच्या ऑफिसमध्ये येणाऱ्या बीडमधील महिलांना अशोक खरातकडे समुपदेशनासाठी आणि पुत्र प्राप्तीसाठी पाठवले जायचे. या पत्रातील उल्लेख गंभीर बाब आहे. अनेक महिलांचं गर्भलिंग निदान केले आहे, हा संपूर्ण उल्लेख पत्रामध्ये करण्यात आल्याचे पिंपळे यांनी सांगितले.
'मी बीडकर अशा नावाने राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांना हे पत्र पाठवण्यात आलं. या पत्रातून धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. या संदर्भात शरद पवार गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी म्हटले आहे की, बीडमधील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकार चालत होता. मात्र याची चौकशी झाली पाहिजे. एसआयटी ने हे पत्र ताब्यात घेऊन संबंधित व्यक्तींना देखील ताब्यात घेतले पाहिजे. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी शरद पवार गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी केली आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याच्या निषेधार्थ परळी तहसील कार्यालयासमोर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आले. भोंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच त्याला अभय देणाऱ्यावर पण कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या भोंदूबाबाला फाशी द्या, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.