Maharashtra Politics: भाजपच्या दावणीला शिवसेना बांधल्याचा आरोप; शिंदेंसमोरच उफाळली शिवसैनिकांची नाराजी, शेवटी खासदार भडकले

Dharashiv Shiv Sena Workers Anger: धाराशिवमध्ये शिवसैनिकांनी खासदार श्रीकांत शिंदेसमोर नाराजीचा पाढा वाचून दाखवला. भाजपच्या दावणीला शिवसेना बांधल्याचा आरोप त्यांनी याेळी केला. या शिवसैनिकांवर श्रीकांत शिंदे चांगलेच भडकले.
Maharashtra Politics: भाजपच्या दावणीला शिवसेना बांधल्याचा आरोप; शिंदेंसमोरच उफाळली शिवसैनिकांची नाराजी, शेवटी खासदार भडकले
MP Shrikant Shindesaam tv
Published On

Summary -

  • शिवसेना शिंदेगटातील अंतर्गत वाद उफाळला

  • भाजपमुळे शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

  • श्रीकांत शिंदे यांच्यासमोर शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी बोलून दाखवली

  • धाराशिव येथील बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला

शिंदेसनेतील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला आहे. धाराशिवच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यापुढे शिवसैनिकांनी अन्यायाचा पाढा वाचून दाखवला. यावेळी शिवसैनिकांनी भाजपच्या दावणीला शिवसेना पक्ष बांधल्याचा आरोप केला. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी संतप्त होत या शिवसैनिकांना खडेबोल सुनावले.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी धाराशिव दौऱ्यावर होते. याठिकाणी शिंदेगटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यादरम्यान अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतले. यावेळी देखील काही शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यांनी देखील अन्यायाचा पाठा एकनाथ शिंदेंसमोर बोलून दाखवणार असल्याचे सांगितले होते. पण त्यांच्या दौऱ्यापूर्वीच त्यांच्याच शिवसैनिकांना नजरकैद केले होते.

धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर निवडणुकीत झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवला. सोलापुरात धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. या सर्व नेत्यांच्या समोरच धाराशिव येथील पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीदरम्यान शिवसैनिकांनी निवडणुकीतील घडामोडींवर चर्चा करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

Maharashtra Politics: भाजपच्या दावणीला शिवसेना बांधल्याचा आरोप; शिंदेंसमोरच उफाळली शिवसैनिकांची नाराजी, शेवटी खासदार भडकले
Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या बड्या नेत्याला अटक, बीड पोलिसांची मोठी कारवाई

नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पक्ष भाजपच्या दावणीला बांधण्याचा पदाधिकाऱ्यांनी आरोप केली. यावेळेस खासदार श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत 'पदाधिकाऱ्यांना शिस्त नाही, बोलायला दिलं तर तुम्ही एकमेकांबरोबर मारामारी करता का?' अशी आक्रमक भूमिका मांडली. तुळजापूर, कळंब आणि धाराशिव तालुक्यातील पक्ष संघटनेच्या कामगिरी बाबत शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.

Maharashtra Politics: भाजपच्या दावणीला शिवसेना बांधल्याचा आरोप; शिंदेंसमोरच उफाळली शिवसैनिकांची नाराजी, शेवटी खासदार भडकले
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंची पॉवरफुल खेळी; महाराष्ट्रातील मोठी राजकीय आघाडी फोडली, दिग्गज नेते शिवसेनेत जाणार

दरम्यान, धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय झाला असून आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे न्याय मागणार असल्याचे शिवसैनिक नितीन पाटील यांनी सांगितले होते. शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या लोकांशी हातमिळवणी करत शिवसेनेतील एकनिष्ठ शिवसैनिकावर अन्याय केला आहे, अशा आरोप नितीन पाटील यांनी केला होता. त्यानंतर आज शिवसैनिकांनी थेट खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोरच पक्षातील अंतर्गत वादावर भाष्य करत नाराजी व्यक्त केली.

Maharashtra Politics: भाजपच्या दावणीला शिवसेना बांधल्याचा आरोप; शिंदेंसमोरच उफाळली शिवसैनिकांची नाराजी, शेवटी खासदार भडकले
Maharashtra Politics: 'सत्तेतला मोठा पक्ष मित्रांची शिकार करणार', राष्ट्रवादीच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com