Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंची पॉवरफुल खेळी; महाराष्ट्रातील मोठी राजकीय आघाडी फोडली, दिग्गज नेते शिवसेनेत जाणार

eknath shinde news : एकनाथ शिंदेंनी पंढरपुरात मोठा डाव टाकला. त्यांच्या खेळीने पंढरपुरातील तीन नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
eknath shinde political news
eknath shinde newsSaam tv
Published On
Summary

पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग

सोलापुरातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीत फूट

आघाडीत फूट पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

पंढरपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतरही राजकीय घडामोडी सुरूच आहे. निवडणुकीआधी नेते मंडळी तिकीटासाठी पक्ष बदलत होते. परंतु आता निवडणूक झाल्यानंतरही काही नेते पक्ष सोडत असल्याचे समोर येत आहे. निवडणुकीनंतर सोलापूर, पंढरपूरमध्ये गेमचेंजर ठरणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीत फूट पडल्याचे समोर आलं आहे. आघाडीत फूट पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पंढरपुरात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं वर्चस्व आहे. याच आघाडीतील नगरसेवकांनी भगीरथ भालकेंपासून फारकत घेतली आहे. भगीरथ भालके, नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि अनिल सावंत यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. या तिन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी खेळी मानली जात आहे. तिन्ही नेत्यांच्या पक्ष प्रवेशाआधीच तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

eknath shinde political news
Sharad Pawar : शरद पवारांना मोठा हादरा; बडा नेता साथ सोडणार, पक्षही निश्चित झाला

मंगळवेढा येथील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांचे पती आणि ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांची भालके यांच्याविषयी नाराजी आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांना अंधारात ठेवून भगीरथ भालकेंनी पक्ष प्रवेश निश्चित केल्याचा आरोप बबनराव आवताडे यांनी केला आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक भालके सोबत जाणार नाही. ते तीर्थक्षेत्र विकास आघाडीसोबत भक्कम असल्याचा दावा आवताडे यांनी केला आहे.

eknath shinde political news
एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

बबनराव आवताडे म्हणाले, 'आमच्या मंगळवेढ्यात तीर्थक्षेत्र आघाडीचे २० नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष मिळून २१ जण आहेत. आम्ही शिवसेनेत प्रवेश करणार नाही. आमची आघाडी जो निर्णय घेईल, तो मान्य असेल. आम्हाला त्यांच्या पक्षप्रवेशाविषयी काहीच माहीत नव्हतं. आमच्या बैठकी झाल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला काहीच माहिती नाही. त्यांचं अचानक ठरलं आहे. आम्हाला कोणीच निरोप दिला नाही. आम्ही कोणीच जाणार नाही. आमच्या आघाडीचे अध्यक्ष देखील जाणार नाहीत. आमच्या आघाडीचे अध्यक्ष जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com