
महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषा वाद सुरु आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवण्याचा सरकारचा निर्णय आहे. या पार्श्वभूमीवर ५ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येत मोर्चा काढणार आहेत. आता हिंदी सक्तीच्या निर्णयावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत दादा भुसे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर भाष्य केले. तर दादा भुसे यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आल्याने चर्चांना उधाण आले.
महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत दादा भुसे म्हणाले की, मराठी आपली मातृभाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. ही अभिमानाची बाब आहे. सर्व मराठी शाळांमध्ये मराठी शिकवणे अनिवार्य आहे. CBSE माध्यमाच्या शाळांमध्ये देशापातळीवर त्या त्या राज्याच्या भाषा शिकवणे बंधनकारक केले आहे, असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर लवकरच देशपातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जाईल असे त्यांनी सांगितली आहे.
मंत्री दादा भुसे पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने १० तासिका मातृभाषेसाठी केल्या असताना आपल्या राज्याने १५ तासिका दिल्या आहेत. मराठीला जास्त वेळ दिला आहे. इंग्रजी भाषा काही वर्षांपासून स्वीकारली आहे. ती काळाची गरज आहे. देश आणि जगाच्या पाठीवर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहे. आता प्रारूपनुसार भारतीय २२ शाखा आहेत. विद्यार्थी आणि पालक जी भाषा निवडतील, ती भाषा असेल. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शिक्षक दिले जाणार आहेत. २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असेल तर ई-शिक्षण दिले जाईल. कोणतीही भाषा बंधनकारक नाही. आता चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बडबड गीत शिकवले जाईल, विद्यार्थ्यांना पुस्तक नाही, शिक्षक पुस्तकाद्वारे शिकवतील. मौखिक पद्धतीने शिक्षण देणे प्रस्तावित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्रिभाषा सूत्र याआधी अनेक शाळेत लागू आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची माहिती देण्यात आली आहे. परदेशात गुणांकन पद्धत आहे. येणाऱ्या काही वर्षात आपला देश गुणांकन पध्दती स्वीकारणार आहे. विद्यार्थ्यांच्या क्रेडिट बँकमध्ये किती गुण आहे? त्यानुसार मूल्यमापन होणार आहे. याचे देशव्यापी परिणाम दिसून येतील. दीड महिन्यांपूर्वी मी केंद्रीय मंत्र्यांना भेटलो. शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे शिक्षण देण्याची मागणी केली. येणाऱ्या काळात शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास शिकविला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.