Dada Bhuse meets Raj Thackeray : हिंदी भाषा सक्तीसंदर्भात राज ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत काय घडलं? दादा भुसेंनी सगळंच सांगितलं|VIDEO

Hindi-Language Policy Sparks Controversy:शालेय शिक्षणातील हिंदी विषयावरून वाद पेटला असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हिंदीला ठाम विरोध दर्शवला.

राज्यातील शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्रानुसार पाहिलीपासून हिंदीच्या अंमलबजावणीवरून सुरू असलेल्या वादावरून मनसे आक्रमक झाली आहे. कुठल्याही परिस्थितीत हिंदी भाषा लादली जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतल्यानंतर याच पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर दादा भुसे यांनी बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, हिंदी भाषेचा पर्याय का ठेवला आहे आणि तो विद्यार्थ्यांसाठी किती महत्वाचा आहे हे आम्ही राज ठाकरे यांच्या समोर ठेवले आहे.

चर्चा संपन्न झाली असून त्यांना या क्षणाला हे मान्य नाही. त्यांनी काही चांगल्या सूचना केल्या आहे. त्या सुचनांची आम्ही नोंद घेतली. त्यांनी सांगितले आहे की देशव्यापी जे काही गुण मोजले जात आहे. त्यामध्ये कला, क्रीडा यांचा समावेश करावा अशी सूचना राज ठाकरे यांनी केली असून ती स्वागतार्या आहे असे भुसे म्हणाले. तसेच हिंदी नको अशी स्पष्ट भूमिका त्यांची आहे. हे सगळे आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पोहचवू असे दादा भुसे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com