Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Shiv Sena UBT leader Sharad Koli sent to Yerwada jail : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एमपीडीए कायद्यानुसार मोठी कारवाई केली. सांगलीतून ताब्यात घेतल्यानंतर त्यांना येरवडा कारागृहात रवाना करण्यात आले.
Sharad Koli detained under MPDA Act
Sharad Koli detained under MPDA Act
Published On: 

Sharad Koli detained under MPDA Act : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद विठ्ठल कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 'एमपीडीए' (MPDA) कायद्यान्वये शरद कोळी यांची एका वर्षासाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धता करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून फरार असलेल्या कोळी यांना स्थानिक गुन्हे शाखेने सांगलीतून बेड्या ठोकल्या.

शरद कोळी यांच्यावर वाळू चोरी, खंडणी वसूल करणे, धमकी देणे आणि अश्लील भाषेत संभाषण करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे पंढरपूर तालुका पोलीस आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे ही कठोर पावले उचलली. कोळी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर स्थानक शिवसैनिक (ठाकरे गट) आक्रमक झाले. राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई झाल्याचा आरोप केला जात आहे.

Sharad Koli detained under MPDA Act
ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता 'या' दिवशी होणार जमा, वाचा मोठी अपडेट

झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, धोकादायक व्यक्ती आणि इतर गुन्हेगारांवर वेसण घालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'एमपीडीए' कायद्यानुसार आठवडाभरापूर्वीच त्यांच्या स्थानबद्धतेचे आदेश काढण्यात आले होते. हे आदेश निघताच शरद कोळी पसार झाले होते. मात्र, सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्यांना सांगलीतून ताब्यात घेतले आणि थेट येरवडा कारागृहात रवाना केले.

Sharad Koli detained under MPDA Act
Housing Society : फ्लॅटधारकांसाठी मोठी बातमी! आता ३ वर्षांत पुनर्विकास पूर्ण करावाच लागणार; नवीन नियम लागू

ठाकरे गटाच्या एवढ्या मोठ्या नेत्यावर तडक एका वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई झाल्याने सोलापूरसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी (४ ऑक्टोबर) पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात (Pandharpur Sub istrict Hospital) शरद कोळीची रीतसर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com