शिवसेना पक्ष-चिन्ह कुणाचा? सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी, एकनाथ शिंदे दिल्लीत; धनुष्यबाण गोठवण्याच्या मागणीवर मोठं विधान

Eknath Shinde Statement On Party Symbol: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरूय. शिंदे गट आपली बाजू मांडणार आहे. ठाकरे गटाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केलीय.
Eknath Shinde Statement On Party Symbol
Eknath Shinde Delhi visit ahead of Supreme Court Shiv Sena symbol hearingsaam tv
Published On
Summary

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

ठाकरे गटाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे.

आता शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबतची सुनावणी चालू आहे. ठाकरे गटाच्या युक्तीवादानंतर आता शिंदे गटाकडून युक्तीवाद कले जाणार आहे. ठाकरे गटाने आपला युक्तीवद संपवताना धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी केलीय. आता उद्या म्हणजेच बुधवारपासून शिंदे गट न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे. त्याचदरम्यान आज मंत्रिमंडळाची बैठकीला दांडी मारत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेत.

Eknath Shinde Statement On Party Symbol
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

एकनाथ शिंदे हे येथे आपल्या वकिलांची आणि कायदेतज्ज्ञांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. आपल्या पक्षाची बाजू आणि बक्कळ पुरावे कशा पद्धतीने मांडता येतील याची चर्चा ते करणार आहेत. याचदरम्यान एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण गोठवण्याच्या मागणीवर मोठं विधान केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. इतक्या तातडतीचा दिल्ली दौरा का?

Eknath Shinde Statement On Party Symbol
Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; निष्ठावंत नेत्याचा राजीनामा,४ माजी नगरसेवकांसह शिवसेनेत करणार प्रवेश

पक्ष आणि पक्षचिन्ह सुनावणी चालू आहे, त्या पार्श्वभूमीवर हा दौरा आहे का? असे प्रश्न पत्रकारांनी केलेत. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, दिल्लीत येण्यासाठी विषय पाहिजे असं काही नाही, मी येत असतो. काही ठिकाणी स्थानिक निवडणुका आहेत, त्याचा आढावा घ्यायचाय. तसेच शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्यापासून जी सुनावणी होतेय, त्यामध्ये शिवसेनेमार्फत आपली बाजू मांडली जात असून त्याचा आढावा घ्यायचाय, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

धनुष्यबाण गोठवण्याच्या मागणीवर काय म्हणाले?

कायदेशीर मुद्दे मांडण्यासाठी वकील आहेत. न्यायालयात सुनावणी चालू आहे. परंतु शेवटी घटना आहे, पक्षाची घटना आहे. पण धनुष्यबाण गोठवण्याची मागणी दुर्दैवी असल्याचं शिंदे म्हणालेत. काही लोक तर न्यायालयाला देखील मार्गदर्शन करतात. निवडणूक आयोगाला तर मार्गदर्शन नाही तर निवडणूक आयोगावर आरोप देखील करतात. पण आमची तशा प्रकारची भूमिका नाहीये. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास जनतेच्या न्यायालयावर आहे. निवडणूक आयोग कोर्ट जेव्हा विरोधात निकाल देत त्यावेळेस त्यांच्यावर आरोप केले जातात. मग सांगतात की आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयात देखील ते लोक गेले होते. परंतु आहेत आणि जनतेने देखील आम्हाला आशीर्वाद भरभरून दिलेला आहे हे देखील महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे.

उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेत. त्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, त्यांनी काही मुद्दे उपस्थित करणं हे आता त्यांचं वकील म्हणून काम आहे. परंतु शेवटी घटना आहे. आपली पक्षाची घटना आहे,देशाची घटना आहे, लोकशाही आहे निवडणूक आयोगाचे अधिकार आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत.आता सुनावणी सुरू झाली की, शिवसेनेच्या वतीने की त्यांच्या मुद्द्याला उत्तर देण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com