Maharashtra Politics: एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांचा प्रवेश होऊ दिला नाही, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी केला आहे. या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
Maharashtra Politics :
Eknath Shinde was going to join Congress Hussain Dalwai claimsaam tv
Published On
Summary
  • एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते हुसेन दलवाईंचा दावा

  • काँग्रेसच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंचा पक्षप्रवेश रोखल्याचा दावा

  • हुसेन दलवाईंचा एकनाथ शिंदेंबाबत खळबळजनक दावा

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंबाबत केल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत धक्कायदायक दावा केलाय. एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये येणार होते मात्र काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांचा प्रवेश होऊ दिला नव्हता , असा दावा हुसेन दलवाई यांनी केलाय. त्यांच्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिलीय.

Maharashtra Politics :
देवेंद्र फडणवीसांनी घेतली PM मोदींची भेट; केंद्रात जाण्याच्या चर्चांचे पतंग स्वतः मुख्यमंत्र्यांनी कापले, भेटीत नेमकं काय झालं?

दलवाईंच्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

हुसेन दलवाई यांच्या एकनाथ शिंदेंच्या बाबतच्या वक्तव्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना पत्रकारांना प्रश्न केला. यावर त्यांनी उत्तर दिलं की, हा नवीन विषय असल्याचं म्हटलंय. एकनाथ शिंदे आणि आमची चर्चा झाली होती. पण काय चर्चा झाली ते सांगणार नाही, अशी भूमिका चव्हाण यांनी घेतली. एकनाथ शिंदे आमचे मित्र आहेत ते आमचं काम करत नाहीत, मात्र आजही आमचे मित्र आहेत ते आमच्या जिल्ह्यातले आहेत.आमच्या अनेक गाठीभेटी झाल्या होत्या, मात्र त्यावर मी बोलणार नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.

Maharashtra Politics :
Maharashtra Politics: भाजपची कार्यकारिणी बदलताच एकनाथ शिंदेंनीही बोलावली खासदारांची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 13 ऑक्टोबरला गोपीनाथ मुंडे आणि माझी भेट झाली होती. त्यानंतर 18 ऑक्टोबरला मी दिल्लीत गेलो होतो. त्यावेळी कोणताही कार्यक्रम नव्हता फक्त हाच विषय दिल्लीत होता. याला साक्षीदार माणिकराव ठाकरे आहेत. गोपीनाथ मुंडेंबाबतचा एकच प्रस्ताव घेऊन गेल्यानंतर सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांच्यासोबत बैठक झाली होती.

गोपीनाथ मुंडेंची भाजपमध्ये होणारी घुसमट मी जवळून पाहिली; राजू शेट्टी

शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देत एक खळबळजनक दावा केला होता. '२००४ ते २०१४ या कालावधीमध्ये गोपीनाथ मुंडे यांची भारतीय जनता पक्षात होणारी घुसमट मी जवळून पाहिलीय,असे शेट्टी म्हणाले होते. 'युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणाऱ्या झोनबंदीच्या निर्णयाच्या विरोधात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केले होतं.

' २००४ ते २००९ पर्यंत मी त्यांच्यासोबत आमदार म्हणून काम केले. तसेच २००९ ते २०१४ या काळात देखील मी खासदार म्हणून त्यांच्यासोबत काम केले. त्यांच्या आग्रहाखातरच मी मोठी चूक केली होती ती म्हणजे एनडीएसोबत जाण्याची. परंतु साहेब गेल्यानंतर मी ती चूक सुधारली. २००४ ते २०१४ या दरम्यान गोपीनाथ मुंडेंची भाजपामध्ये होणारी घुमट मी जवळून पाहिली होती.', असा गौप्यस्फोट राजू शेट्टींनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com