Sanjay Raut News: अजितदादांच्या त्या विधानाशी मी सहमत, त्याबद्दल मला खेद वाटतो; संजय राऊत काय म्हणाले, वाचा...

Sanjay Raut on Ajit Pawar: अजितदादा आणि पवार परिवारांसोबत माझे स्नेहाचे संबंध आहेत. ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut on Ajit Pawar Maharashtra Politics
Sanjay Raut on Ajit Pawar Maharashtra Politics Saam TV
Published On

Sanjay Raut on Ajit Pawar: अजितदादा आणि पवार परिवारांसोबत माझे स्नेहाचे संबंध आहेत. ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. ते काल (शनिवारी) असं बोलले की महाराष्ट्रामध्ये संयमाने बोललं पाहिजे, संयमाने वागलं पाहिजे, मी त्यांच्या विधानाशी सहमत आहे, त्यांच्याबद्दल मला वेगळा प्रश्न विचारण्यात आला, म्हणून मी कडक शब्दात भाष्य केलं. त्याबद्दल मला खेद वाटतो, असं म्हणत संजय राऊतांनी वादावर पडदा टाकला. (Latest Marathi News)

Sanjay Raut on Ajit Pawar Maharashtra Politics
Nana Patole News: पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच!; नागपुरात झळकले नाना पटोलेंचे बॅनर; भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. याशिवाय अजित पवार यांच्यासोबत रंगलेल्या राजकीय कलगीतुऱ्यावर देखील पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

काय म्हणाले संजय राऊत?

उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले नेते आणि त्यांची गद्दारी कधीही विसरता येणार नाही. गद्दार हे सूर्याजी पिसाळांची औलाद आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना-शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. 50 खोके घेऊन सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, अशी टीकाही संजय राऊतांनी (Sanjay Raut) केली.

आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटे येत आहेत म्हणून भाजपसारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा विचार येत नाही, त्यामुळे अशा चर्चा निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी शिवराज्याभिषेकावरून सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. सत्ताधारी जे करत आहेत, ते अगदीच हास्यास्पद आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.  (Maharashtra Political News)

Sanjay Raut on Ajit Pawar Maharashtra Politics
Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांचं महाविकास आघाडीबाबत मोठं विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

'अजितदादांबद्दल बोललो, त्याबद्दल मला खेद वाटतो'

अजितदादा काल (शनिवारी) असं बोलले की महाराष्ट्रामध्ये संयमाने बोललं पाहिजे, संयमाने वागलं पाहिजे, मी त्यांच्या विधानाशी सहमत आहे, त्यांच्याबद्दल मला वेगळा प्रश्न विचारण्यात आला, म्हणून मी कडक शब्दात भाष्य केलं. त्याबद्दल मला खेद वाटतो, असं म्हणत संजय राऊतांनी वादावर पडदा टाकला.

दरम्यान, संजय राऊत हे मोठे नेते आहे, ते राज्यसभेचे खासदार आहेत. माझं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही, मी माझ्या कार्यकर्त्यांना सर्व समजावून सांगितलं आहे. तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुद्धा संजय राऊत यांच्याबद्दलच्या विषयावर पडदा टाकला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com