Nana Patole News: पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच!; नागपुरात झळकले नाना पटोलेंचे बॅनर; भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

Nana Patole future Chief Minister Banner: दक्षिण नागपूर शहरात अनेक ठिकाणी हे नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असलेलं बॅनर लावण्यात आलं आहे.
Nana Patole News
Nana Patole NewsSaam TV

Nagpur: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशात भावी मुख्यमंत्री कोण असणार यावरही चर्चा होत आहे. मुख्यमंत्री पदाच्या या चर्चेत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव देखील दाखल झालं आहे. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा मजकूर लिहिलेले पोस्टर्स समोर आले आहेत. (Congress State President Nana Patole)

उद्या (5 जून) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस असून नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना परिसरात हे बॅनर (Banner) लावले आहेत. दक्षिण नागपूर शहरात अनेक ठिकाणी नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेलं बॅनर लावण्यात आलं आहे.

Nana Patole News
Parbhani Crime News: कौटुंबिक वाद शिगेला; ३२ वर्षीय महिलेने उचललं टोकाचं पाऊल

पोस्टरवर माननीय आमदार नाना पटोले भावी मुख्यमंत्री, शेतकरी पुत्र, कामकरी लोकांचे कैवारी, असा उल्लेख करण्यात आला आहे. नागपूरात गिरीश पांडव हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांनी नाना पटोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असे बॅनर लावलेत.

सध्या सोशल मीडियावर नाना पटोलेंचे (Nana Patole) हे पोस्टर्स व्हायरल होत आहेत. अशात यावर पटोलेंनी स्वत: आपली प्रतिक्रिया दिली आहे. बॅनरविषयी पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, "भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेल्या पोस्टरविषयी मला समजलं, मात्र अशा प्रकारचे पोस्टर्स कोणीही लावू नयेत. माझा हा वाढदिवस मला सामाजिक कार्य करत साजरा करायचा आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने विद्यार्थ्यांना हवं तसं शिक्षण घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत मी हा वाढदिवस साजरा करणार आहे. "

Nana Patole News
Maharashtra Political News: पंकजा-प्रीतम मुंडेंना भाजपमध्ये पाहिजे तो सन्मान दिला जात नाही; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

तसेच आगामी लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना नाना पटोले म्हणाले की, " काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्याच अनुषंगाने आम्ही बैठक घेतली. कार्यकर्ते, पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. ज्याचे जास्त आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, ही प्रथा आहे. काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणुकांना सामोरे जाऊ, असं ठामपणे पटोले म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com