Parbhani Crime News: कौटुंबिक वाद शिगेला; ३२ वर्षीय महिलेने उचललं टोकाचं पाऊल

पतीसह सासरच्या मंडळीकडून सततच्या मारहाणीला कंटाळून एका ३२ वर्षीय विवाहित महिलेने जीवन संपवल्याची घटना घडली आहे.
Parbhani Crime News
Parbhani Crime NewsSaam tv

Parbhani Crime News: पतीसह सासरच्या मंडळीकडून सततच्या मारहाणीला कंटाळून एका ३२ वर्षीय विवाहित महिलेने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आव्हई येथे ही घटना घडली. या घटनेची माहिती विवाहितेच्या माहेरी समजताच ते गाड्या घेऊन आव्हाई येथे दाखल झाल्याने गावात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर महिलेच्या सासरचे लोक फरार झाले. याप्रकरणी उशिरा पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

लोचना ज्ञानेश्वर पवार (वय ३२ वय) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. नवरा ज्ञानेश्वर पवार, सासू सखुबाई पवार व सासरा उद्धव पवार हे 'तुझ्या माहेराहून पैसे घेऊन ये, म्हणून सतत मृत लोचना हिला मारहाण करत असे.

काही महिन्यांपूर्वी त्रासास कंटाळून विषारी औषधही तिने प्राशन केले होते. त्यानंतर नातेवाईकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले होते. परंतु वारंवार लोचनाला पैशांसाठी सासू-सासरे पती यांच्याकडून मारहाण होत होती, असे तक्रारी म्हटले आहे.

Parbhani Crime News
Kalyan Crime News: आरोपी लघुशंकेच्या बहाण्याने शौचालयाला गेला अन् खिडकीतून पळाला; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

सततच्या त्रासाला कंटाळून लोचना हिने टोकाचे पाऊल उचलत काल सायंकाळच्या सुमारास जीवन संपवलं. ही घटना मुलाने ग्रामस्थांना कळवली. घटना घडताच पती ज्ञानेश्वर व सासू सखुबाई, सासरे उद्धव श्रीपती पवार गावातून पसार झाले आहे.

Parbhani Crime News
Yavatmal Crime News : मुलीच्या शिक्षणासाठीचे नव्वद हजार रुपये चाेरीस, कुटुंबास बसला धक्का

घटनेची माहिती पोलिस पाटील संदीप सोनवणे यांनी पूर्णा पोलिसांना माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.

याप्रकरणी मृत महिलेचा भाऊ नानाराव भाऊराव जामगे यांच्या फिर्यादीवरून पती,सासू- सासरे या तीघांजणांविरुद्ध मयत लोचनाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com