Eknath Khadse News:भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यामुळे पंकजा मुंडे या भाजप सोडणार का, अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. 'पंकजा-प्रीतम मुंडेंना भाजपमध्ये योग्य सन्मान दिला जात नाही, अशा शब्दात एकनाथ खडसेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)
पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केलं आहे. 'गोपीनाथ मुंडे यांच्या अनेक आठवणी आहेत. या भारतीय जनता पक्षाला मुंडे साहेबांनी संघर्ष केल्यामुळे आज भाजपला चांगले दिवस आले आहेत. भाजप आधीसारखी राहिलेली नाही. ज्यांचे 2 खासदार होते, आज त्यांचे मोठ्या प्रमाणात खासदार आहेत', असे खडसे म्हणाले.
'भाजपचा पाया झाला, त्यांना भाजपकडून बाजूला केलं गेलं आहे. मुंडे साहेबांनी पक्षासाठी बलिदान दिलं. आज पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना पाहिजे, तेवढा सन्मान दिला जात नाही. ही खंत आहे. पक्षासाठी ज्यांचे योगदान शून्य आहे, जे बाहेरून आले आहेत, ते उच्च पदावर आहेत, असे एकनाथ खडसे म्हणाले.
'भाजपची आधीची प्रतिमा होती, ती आज नाही. भाजपचे आधीचे तत्व आज नाही, मी अनेक वर्ष भाजपमध्ये होतो, म्हणून आज खंत आहे. आम्ही ज्यांच्याविरोधात संघर्ष केला, आज ते भाजपमध्ये चांगल्या पदावर आहेत. आज भाजप चित्र बदलले आहे नेतृत्व बदलले आहे, असे खडसे पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.