Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांचं महाविकास आघाडीबाबत मोठं विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Prakash Ambedkar on Mahavikas Aaghadi: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं विधान केलं आहे.
Prakash Ambedkar on Mahavikas Aaghadi
Prakash Ambedkar on Mahavikas AaghadiSaam TV

Prakash Ambedkar on Mahavikas Aaghadi: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं विधान केलं आहे. सध्याच्या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणात महाविकास आघाडी एकत्र राहिल असे वाटत नाही. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.  (Latest Marathi News)

Prakash Ambedkar on Mahavikas Aaghadi
Ajit Pawar News: संजय राऊत हे मोठे नेते, माझं त्यांच्यावर.., अजित पवारांनी एका वाक्यात विषयच संपवला

कुठल्या तरी कारणाने महाविकास आघाडीत भांडणे होऊन खेळखंडोबा होईल आणि यातून ते वेगळे होईल, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर युती करायची किंवा नाही याचे उत्तर देवाकडेही नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आहे. कारण कठपूतलीप्रमाणे ते सर्वांना नाचवत आहेत, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.(Maharashtra Political News)

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुर्ला येथे सत्ता परिवर्तन सभा आयोजित केली होती. या सभेला वंचितच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या सभेला मार्गदर्शन करताना वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर भाष्य करताना काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच भाजपावरही निशाणा साधला.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

सध्याच्या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणात महाविकास आघाडी एकत्र राहिल असे वाटत नाही. कुठल्या तरी कारणाने महाविकास आघाडीत भांडणे होऊन खेळखंडोबा होईल आणि यातून ते वेगळे होईल, असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटलं आहे.

Prakash Ambedkar on Mahavikas Aaghadi
Pankaja Munde News: माझ्या खांद्यावर बंदूक ठेवू नका; पंकजा मुंडे यांचा रोख कुणाकडे? अमित शाहांची भेट घेणार

महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) आम्हाला अद्याप बाहेर ठेवले आहे. आम्हाला बाहेर ठेवले तरी तुमचा जो काही समझोता आहे तो तरी करा, असे आवाहन करीत लोकसभेच्या 48 जागांचे वाटप तुम्ही कसे करणार, त्या जागावाटपासाठी तरी तुम्ही एकत्र या, असा सल्लाही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला.

उद्याच्या सत्तेचा निर्धार करायचा आहे. कुठल्यातरी युतीत आपण राहणार याबद्दल दुमत नाही, पण आपला निर्धार कायम ठेवला पाहिजे, जे येतील त्यांच्यासोबत नाहीतर त्यांना सोडून सत्तेची लढाई लढू, असा निर्धार आंबेडकर यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीने आम्हाला शिकवू नये!

ईडी हा सर्वांचा बाप आहे, या बापाने दोरी खेचायला सुरुवात केली, तर राष्‍ट्रवादी काँग्रेसमधील अनेकजण बाहेर पळायला सुरूवात करतील, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला. आज आम्ही जेथे आहोत तेथेच आहोत. आम्हाला शहाणपणा शिकवू नका, नाहीतर तुमच्या अनेक गोष्टी बाहेर काढाव्या लागतील. असा इशाराही आंबेडकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com