Shivrajyabhishek 2026 : शिवराज्याभिषेकासाठी अनोखी वारी! ३९ किलो वजनाचा लावाजमा शिरावर घेऊन निष्ठावंत शिवभक्ताचा रायगडकडे पायी चार हजार किलोमीटरचा प्रवास

Raigad Fort: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या शिव एकनाथ शिंदे यांनी ३९ किलो वजनाचा लावाजमा आणि शिवरायांचा पुतळा शिरावर घेऊन रायगडकडे प्रेरणादायी पायी यात्रा पूर्ण केली.
Shivrajyabhishek 2026
Shivrajyabhishek 2026google
Published On

अमित गवळे सकाळ वृत्तसेवा

पाली : शिवाजी महाराजांबद्दल अथांग आदर व सार्थ अभिमान बाळगणारा एक तरुण सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाची तीव्र ओढ असलेला शिव एकनाथ शिंदे (वय ३०, रा. आडगाव भोसले, ता. कन्नड, जि. छ.संभाजीनगर) हा तरुण पाठीवर धान्य, कपडे, भांडी आणि डोक्यावर लोखंडी चौकटीवर विराजमान असलेला शिवरायांचा पुतळा घेऊन रणरणत्या उन्हात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संभाजीनगर ते त्र्यंबकेश्वर आणि तिथून पुढे किल्ले रायगड असा पायी प्रवास करत आहे. एकूण ३९ किलो वजनाचा हा संपूर्ण लावाजमा सांभाळत त्याचा हा खडतर पायी प्रवास सुरू आहे.

हा शिवप्रेमी मंगळवारी (ता. 2) श्री बल्लाळेश्वर क्षेत्र पाली येथे दर्शनासाठी पोहोचला. तेथे किल्ले सरसगडाला मानवंदना देऊन त्याने पुढे रायगड किल्ल्याकडे कूच केली. या प्रवासादरम्यान जागोजागी अनेक शिवप्रेमींनी त्याचे मनापासून स्वागत केले आणि त्याच्यासोबत असलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे भावुक होऊन दर्शन घेतले. बुधवारी (ता. ३) तो किल्ले रायगडावर पोहोचला. शनिवारी (ता. 6) शिवराज्याभिषेक झाल्यावर तो परतीच्या मार्गाला लागणार आहे. या आधी त्यांनी पायी चार हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. वर्षभरातील ११ महिने घरी राहिल्यानंतर पुन्हा एक महिना त्याचा हा अनोखा प्रवास अशाच पद्धतीने सुरू होतो. आगामी काळात पायी चालत एक जोतिर्लिंग पूर्ण करून पुन्हा रायगडकडे येण्याचा त्याचा संकल्प आहे. अशा प्रकारे त्याला बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करायचे आहे. व प्रत्येकवेळी रायगडकडे यायचे आहे.

Shivrajyabhishek 2026
Women Rights : विवाहित मुलींनाही मिळणार योजनांचा लाभ; सुप्रीम कोर्टाच्या ५ महत्त्वाच्या टिप्पण्या

या खडतर प्रवासाबाबत जेव्हा काही शिवप्रेमींनी त्याला विचारले की, "तुम्ही एवढ्या लांबचा पायी प्रवास कसा काय करता?" तेव्हा त्याने अतिशय स्वाभिमानाने उत्तर दिले, "मला अभिमान आहे की माझा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुस्तानात आणि महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत झाला आहे. घरातून प्रवासासाठी बाहेर पडल्यानंतर मला खऱ्या अर्थाने कळाले की, या हिंदुस्तानच्या भूमीत महाराजांचे स्थान किती अढळ आहे.

महाराजांनी आपल्यासाठी केवढे मोठे वैभव आणि ओळख निर्माण करून ठेवली आहे, याची प्रचिती मला पावलोपाव आली. रस्त्याने जाताना प्रत्येक निष्ठावंत शिवप्रेमी मला थांबवून महाराजांचे दर्शन घेत होता. अनेक जण हात मिळवून माझे अभिनंदन करत होते. कोणी पाण्याची बाटली देत होते, तर कोणी नाश्ता आणि जेवणाची विचारपूस करत होते. या रायगड नगरीत आणि वाटेत माझा खूप आदर करण्यात आला. महाराजांच्या कर्तुत्वाचा मला प्रचंड गर्व आहे आणि याच प्रेरणेतून मला पुढे पायी चालत बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण करायची आहे."

पाली-सिद्धेश्वर मार्गावरून प्रवास करत असताना या शिवप्रेमीचे अनोखे कौतुक करण्यात आले. हभप महेश पोंगडे महाराज, सिद्धेश्वरचे शिवप्रेमी रवींद्र यादव, कर्जत दहिगावचे देशमुख आणि मंगेश यादव यांनी रस्त्याच्या कडेला गाड्या थांबवून या शिवप्रेमीचे स्वागत केले आणि त्याच्या या अनोख्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळ, पाली, पाठीवर साहित्याचे ओझे आणि डोक्यावर लोखंडी स्ट्रेचरवर विराजमान असलेला शिवछत्रपतींचा पुतळा घेऊन पायी प्रवास करताना शिवप्रेमी शिव एकनाथ शिंदे. (छायाचित्र, अमित गवळे)

फोटो ओळ, पाली, प्रवासादरम्यान विश्रांतीसाठी थांबलेला शिवप्रेमी आणि शेजारी आदरपूर्वक ठेवलेला शिवरायांचा पुतळा. (छायाचित्र, अमित गवळे)

फोटो ओळ, पाली, प्रवासादरम्यान शिव शिंदे याचे स्वागत करताना स्थानिक शिवप्रेमी नागरिक. (छायाचित्र, अमित गवळे)

Shivrajyabhishek 2026
Heart Attack Tests: हार्ट अटॅकची भीती वाटतेय? मग आत्ताच करा या 2 टेस्ट, डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com