
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक शिवराज्यभिषेक सोहळ्याला आज ३५१ वर्ष पूर्ण झाली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी रायगडावर दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच शिवभक्तांसाठी खास काही उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी खास २२ मंडपाची, ५०० लिटरच्या ५० पाण्याच्या टाक्यांची, आणि १ लाख पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ८ आरओ यंत्रं लावण्यात आली आहे. यासह शिवभक्तांच्या आरोग्यासाठी १५ ठिकाणी वैद्यकीय मदत केंद्रं उभारण्यात आली आहे.
गडावरील संपूर्ण हालचालींवर नजर ठेवण्यासाठी रायगड ते पाचाड परिसरात १०९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. १७ ठिकाणी ‘पब्लिक अलाऊंस सिस्टम’ असून, मुख्य सोहळा ९ एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे. दिशा दाखवण्यासाठी ठिकठिकाणी फलकही लावण्यात आले आहेत. तसेच सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवप्रेमींना पार्किंगपासून पाचाडपर्यंत ने आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या १०० बसगाड्या सज्ज आहेत. यासह १२ ठिकाणी पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने १७० पोलिस अधिकारी, १२०० पोलिस कर्मचारी, ३५० होमगार्ड आणि १ एसआरपी प्लाटून गडावर तैनात आहेत. १५० वॉकीटॉकी आणि स्वतंत्र कंट्रोल रूम देखील उभारण्यात आली आहे. प्रत्येक विभागाचा पीआरओ नियंत्रण कक्षात उपस्थित असणार आहे.
कोल्हापुरात दिमाखात राज्यभिषेक दिन सोहळा साजरा
कोल्हापुरात यावर्षी नवीन राजवाड्यातल्या दरबार हॉलमध्ये ३५१ वा राज्याभिषेक दिन सोहळा पार पडत आहे. शाहिरी पोवाडा, मराठा लाईट इनफन्ट्रीच्या सिल्व्हर वाद्यवृंदाचे सादरीकरण, समूह गीत आदी कार्यक्रम सुद्धा पार पडत आहेत. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्ण मूर्तीवर अभिषेक झाला. या सोहळ्यास खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह राजपरिवारातील सदस्य, शासकीय अधिकारी, समाजातील मान्यवर आणि शिवभक्त उपस्थित आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.