Maharashtra Politics: नाशिकमध्ये राजकीय भूकंप, ठाकरे गटातील बडा नेता भाजपच्या वाटेवर; मंत्र्यांकडून स्पष्ट संकेत

Shiv Sena Leader: नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
Thackeray group
Thackeray groupSaam
Published On

नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी पक्षाविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

नाशिकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की, “कोणीही भाजपमध्ये यायला इच्छुक असेल, तर पक्ष वाढीसाठी भाजपचे दरवाजे नेहमी उघडे आहेत.” बावनकुळेंनी दिलेल्या संकेतानंतर बडगुजर भाजप पक्षात प्रवेश करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुधाकर बडगुजर यांनी संघटनात्मक बदलावरून पक्षात १० ते १२ जण नाराज असल्याचं जाहीरपण कबूल केलं. यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पक्षविरोधी कारवाई केल्याने बडगुजर यांची हकालपट्टी केल्यातं जाहीर केलं. यानंतर सुधाकर बडगुजर यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. 'पक्षाने कुणाची हकालपट्टी करायची, कुणाला पक्षात ठेवायचं, हा सर्वस्व पक्षाचा निर्णय आहे. यावर मी काहीही बोलू इच्छित नाही. माझी भूमिका काय असेल, यावर मी योग्यवेळी प्रतिक्रिया देईन,' असं बडगुजर म्हणाले होते.

Thackeray group
Ambernath: माजी नगरसेवकाच्या मुलाकडून गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला, रस्त्यावर रक्ताचे पाट; अंबरनाथमध्ये रक्तरंजित थरार

यानंतर नुकतंच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत मोठे संकेत दिले आहेत. “कोणीही भाजपमध्ये यायला इच्छुक असेल, तर पक्ष वाढीसाठी भाजपचे दरवाजे नेहमी उघडे आहेत.” असं बावनकुळे म्हणाले.

तसेच सीमा हिरे यांच्या नाराजीबाबत विचारता बावनकुळे म्हणाले, “गैरसमज दूर व्हायला वेळ लागतो, पण शेवटी तो दूर होतो. पुढची भूमिका गिरीश महाजन घेतील. आगामी काळात कुणी पक्षात येणार असतील तर, त्यांचं स्वागत. संघटना मजबूत करायची आहे, असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं.

सुधाकर बडगुजर यांच्यावर काही आरोप झाले आहेत. यावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, 'कोणावरही आरोप होणे ही सामान्य बाब आहे. मात्र, न्यायालयात दोष सिद्ध होईपर्यंत कुणालाही आरोपी म्हणता येणार नाही', असंही बावनकुळे म्हणाले.

Thackeray group
Leader Viral: कारमध्ये नेत्याचा खुल्लाम खुल्ला रोमान्स, एकानं रंगेहाथ पकडलं अन् व्हिडिओ व्हायरल केला; महिला पॅन्ट घालत असताना..

ज्या लॉन्समध्ये सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला, त्याच लॉन्सच्या बाहेर बावनकुळे यांनी दिले बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत. यामुळे राजकारणात लवकरच मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com