

सोलापूर-धुळे महामार्गावर साईभक्तांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात.
धाराशिवमधील आळणी पाटीजवळ शिर्डीहून परतताना अपघात झाल्याची माहिती.
अपघातात बब्रुवान सूर्यवंशी आणि छबुबाई दुधभाते यांचा मृत्यू.
बालाजी सुरवसे, साम प्रतिनिधी
सोलापूर-धुळे महामार्गावर साई भक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. धाराशिवच्या आळणी पाटीजवळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा अपघात झाला. या अपघातात दोघा्ंचा मृत्यू झालाय. २२ ते २३ भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.यामध्ये दोन वयोवृद्धांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी भाविक धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बोरी,मातोळा गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. या अपघातात बब्रुवान सुर्यवंशी व छबुबाई दुधभाते या दोघांचा मृत्यू झाला आहे.
डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज परिसरात बुधवारी एका भरधाव कारने विरुद्ध दिशेने येत दोन कार आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी घटना तळली आहे मात्र दोन लोक किरकोळ जखमी असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे.
या अपघातामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, तर वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला.डोंबिवली-कल्याण शिळ मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीला टाळण्यासाठी अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचा धोका पत्करत असल्याचे चित्र वारंवार दिसून येते. अशाच प्रकारातून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीसह 'राँग साईड'ने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.