एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Shiv Sena Shinde Faction Leader Arrested In Nashik Assault Case: नाशिकच्या येवला तालुक्यात घरकुल योजनेवरून शिंदे गटाच्या तालुका अध्यक्षासह तिघांना अटक केली आहे.
Shiv Sena (Shinde faction) leader Pandurang Shelke arrested in Nashik for allegedly assaulting a woman over a government housing scheme dispute.
Shiv Sena (Shinde faction) leader Pandurang Shelke arrested in Nashik for allegedly assaulting a woman over a government housing scheme dispute.saam tv
Published On

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील धुळगाव येथे एका निराधार महिलेच्या शासनमान्य घरकुल बांधकामाला विरोध करत शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचा तालुका अध्यक्षासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

Shiv Sena (Shinde faction) leader Pandurang Shelke arrested in Nashik for allegedly assaulting a woman over a government housing scheme dispute.
राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट! 5 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

काय आहे प्रकरण?

धुळगाव येथील रहिवासी मीराबाई मगन जाधव या निराधार महिलेला शासनाकडून घरकुल योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी मंजुरी मिळाली होती. सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी बांधकामासाठी खोदकाम सुरू केले. मात्र, काम सुरू होताच स्वतःला शिवसेना शिंदे गटाचा येवला तालुका अध्यक्ष म्हणवणाऱ्या पांडुरंग शेळके याने कुटुंबीयांसह जागेवर येऊन महिलेशी शिवीगाळ केली, मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

Shiv Sena (Shinde faction) leader Pandurang Shelke arrested in Nashik for allegedly assaulting a woman over a government housing scheme dispute.
Maharashtra Accident: महाराष्ट्राचे धक्कादायक वास्तव! दररोज ४४ जणांचा अपघाती मृत्यू, या ५ जिल्ह्यात सर्वाधिक अपघात; आकडे वाचून थक्क व्हाल

या प्रकरणी पांडुरंग शेळके, वाल्मिक शेळके, विठ्ठल शेळके, अंजनाबाई शेळके, आरती शेळके आणि लता शेळके अशा सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 190, 191(2), 191(3), 115(2), 352, 351(2) व 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तालुका अध्यक्ष पांडुरंग शेळके व त्यांच्या दोन भावांना अटक केली असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

Shiv Sena (Shinde faction) leader Pandurang Shelke arrested in Nashik for allegedly assaulting a woman over a government housing scheme dispute.
MLc Election : महायुतीत मोठा भूकंप? भाजप-शिंदेसेनेत ४ जागावरून जुंपली! नक्की काय घडतंय? VIDEO

या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. महिलांच्या हक्कासाठी बोलणारेच जर गरीब आणि निराधार महिलांवर अन्याय करत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. शासनाने दिलेल्या हक्काच्या घराला राजकीय व्यक्तींकडून विरोध होणे हे लोकशाहीला काळीमा फासणारे असल्याची भावनाही नागरिकांमध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com