'शेतकऱ्यांना त्रास झालेला चालेल, उद्योजकांना नको'; गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान

MLA Gulabrao Patil : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका विधानानं खळबळ उडवून दिलीय. पाटलांना उद्योगपती आवडू लागले असून शेतकऱ्यांचं वावडं असल्याचं दिसतंय.नेमकं काय झालंय.पाहूयात हा रिपोर्ट.
MLA Gulabrao Patil  :
Gulabrao Patil controversial statement on farmers and industrialists
Published On
Summary
  • शेतकऱ्यांना त्रास झालेला चालेल उद्योजकांना नको गुलाबराव पाटील

  • गुलाबराव पाटील यांचं शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान

  • गुलाबराव पाटील यांच्या विधानामुळे राजकीय वाद

ऐकलंत. राज्यातील जबाबदार मंत्र्यानं केलेलं हे बेजबाबदार वक्तव्य. एकीकडे राज्यात स्मार्ट मीटरमुळे शेतकरी त्रस्त झालेला असताना राज्याचे जबाबदार मंत्री मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताहेत. जळगावमधील एका कार्यक्रमात शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय, ते नीट ऐका.

MLA Gulabrao Patil  :
School Closed: चंद्रपूर-गडचिरोलीला पावसाचा रेड अलर्ट; सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

गुलाबराव पाटलांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत असून विरोधकांनी त्यांना धारेवर धरलंय. आधीच शेतकरी स्मार्ट मीटरमुळे मेटाकुटीला आलाय. त्यात त्याला शेतीसाठी पूर्ण वेळ वीज मिळत नाही. मात्र बिल पूर्ण भरावं लागतं. यासाठी उपाययोजना करण्याचं सोडून मंत्र्यांनी उद्योगपतींची तळी उचलून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाचं समर्थन नेमकं कशासाठी केलं? हा प्रश्न सर्वांना पडलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com