School Closed: चंद्रपूर-गडचिरोलीला पावसाचा रेड अलर्ट; सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

Chandrapur-Gadchiroli School Closed: पावसाच्या इशाऱ्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोलीमधील शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्गांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गडचिरोलीसाठी २९ जुलै रोजी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
Chandrapur-Gadchiroli School Closed
Schools and colleges in Chandrapur and Gadchiroli will remain closed amid heavy rainfall saam tv
Published On
Summary
  • चंद्रपूर गडचिरोली शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी

  • गडचिरोलीत 29 जुलै रोजी पावसाचा रेड अलर्ट

  • विदर्भात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात गेल्या चार दिवसांपासून दमदार पाऊस होतोय. विदर्भातही जोरदार पाऊस होतोय. त्याच दरम्यान आज भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवस विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवलाय. तर गडचिरोली जिल्ह्यासाठी २९ जुलै रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवरून चंद्रपूर, गडचिरोलीतील सर्व शाळा, कॉलेज क्लासेसला उद्या सुट्टी देण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उद्या, २९ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, आश्रमशाळा, आयटीआय आणि व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनीही अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांच्या परिसरात जाऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यानं शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीय. अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भासाठी मुसळधार पावसाचा इशारा

नागपूरला हवामान विभागाने ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. प्रशासनाने गावपातळीवर खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या २४ तासांत विदर्भात सर्वाधिक १३९ मिमी पावसाची नोंद भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे झाली. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे १०३.४ मिमी पाऊस झाला. या दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झालीय.

हवामान विभागानुसार २९ जुलै रोजी नागपूर, भंडारा, वर्धा, या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर यवतमाळसह अकोला, अमरावती, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

३० जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यास रेड अलर्ट असून भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आलाय. ३१ जुलै रोजी अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com