'गद्दारांपेक्षा निष्ठावान मुस्लीम परवडला'; महापौर मुसलमान, ठाकरे-शिंदेसेनेत घमासान, VIDEO

eknath shinde vs thackeray group : परभणी महापालिकेत ठाकरेसेनेनं मुस्लीम महापौर बसवल्यानं राजकारण तापलयं... विरोधकांनी ठाकरेसेनेवर टीका केल्यानं राऊतांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय... त्यामुळे मुस्लीम महापौरावरून विरोधक आणि ठाकरेसेनेत कसं घमासान सुरु आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
eknath shinde vs thackeray group news
eknath shinde vs thackeray group :Saam tv
Published On

हिंदुत्वाचा झंझावात निर्माण करणाऱ्या बाळासाहेबांनी याचं साबिर शेख यांना 1995 मध्ये भाजप-सेना युती सरकारमध्ये कामगार आणि रोजगार मंत्री केलं होतं...त्याच सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसलेल्या भाजपानं आता मुस्लीम महापौर केल्यानं ठाकरेसेनेची तुलना थेट औरंगजेबाशी केलीय. तर दुसरीकडे शिंदेसेनेनेही ठाकरेसेनेला मुस्लीम महापौर दिल्यानं चांगलचं घेरलयं.

eknath shinde vs thackeray group news
महादेवासाठी गाताना थेट त्यांच्याशीच बोलते...; ‘शंभू रे’ भजनाविषयी अमृता फडणवीसांची भावना, VIDEO

दुसरीकडे विरोधकांच्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर देत...तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुस्लीम परवडला अशी टीका केलीय..

मात्र परभणी महापालिकेत मुस्लीम महापौर देण्यामागचं गणित नेमकं काय आहे? पाहूयात..

परभणीत 65 पैकी 29 नगरसेवक हे मुस्लीम समाजाचे आहेत.. त्यामध्ये ठाकरेसेनेचे 25 पैकी 13 नगरसेवक हे मुस्लीम आहेत... काँग्रेसचे 12 पैकी 8 नगरसेवक हे मुस्लीम समाजाचे आहेत... दादांच्या राष्ट्रवादीचे 11 पैकी 6 नगरसेवक मुस्लीम आहेत.. तर दोन अपक्ष मुस्लीम नगरसेवक आहेत.. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेसेनेच्या 37 पैकी 21 नगरसेवक हे मुस्लीम असल्यानं परभणी ठाकरेंना मुस्लीम महापौर द्यावा लागलाय...

eknath shinde vs thackeray group news
Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

कधीकाळी हिंदूत्वाची कास धरणाऱ्या बाळासाहेबांनी विश्वासानं साबिर शेख यांना शिवसेनेकडून तब्बल 15 वर्ष आमदारकी तर 5 वर्षांसाठी मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती...त्यामुळे सय्यद इक्बाल यांच्या निमित्ताने परभणीत पुन्हा नव्याने समीकरण जुळवण्याचा प्रयत्न ठाकरेसेनेने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com