

सचिन जाधव
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न स्वप्नच राहीलं, असं वक्तव्य केलं होतं. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 'शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही, असा मोठा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. (Latest Marathi News)
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पुणे दौऱ्यावर आहेत. बावनकुळे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान आगामी निवडणुकांवर मोठं भाष्य केलं आहे.
'बारामती लोकसभा मतदार संघातून यावेळी महायुतीच्या उमेदवाराचा विजय होणार आहे. महायुतीतील अकरा पक्षातील कोणाला उमेदवारी मिळेल, हे आताच सांगू शकत नाही. मात्र, ती जागा अजित पवार यांच्या पक्षाला जरी सोडली, तरीही त्यांच्या विजयासाठी भाजप सर्व ताकद लावेल', असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे.
'बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल, हे महत्त्वाचे नाही. परंतु बारामती जिंकणे महत्वाचे आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या गटाचा उमेदवार बारामतीमध्ये असला तरी त्यालाही विजयी केले जाईल, असे ते पुढे म्हणाले.
बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा या निवडणूक लढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पवार कुटुंबीयातील उमेदवार देणार का? यावरही बावनकुळे यांनी नेमक्या शब्दात भाष्य केलं.
'बारामतीमध्ये महायुतीचा कोण उमेदवार असेल. या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल हे वरिष्ठ नेते ठरवतील. अजित पवार गटाचा उमेदवार असला तरी त्याला महायुतीची ५१ टक्के मते मिळतील. त्यामुळे उमेदवार कोण हे महत्त्वाचे नाही. बारामती जिंकण्याचा निर्धार असून कार्ययकर्ते सहाशे घरांना भेटी देतील,असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शरद पवारांच्या वक्तव्यावर देखील बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलंय. 'अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची संधी होती, मात्र, शरद पवार यांनी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.