Narendra Modi in P20 Summit : दहशतवादाविरुद्ध कठोर व्हायला हवं! PM मोदींनी अख्ख्या जगाला निक्षून सांगितलं

Narendra Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.
Narendra Modi Speech P20 Summit
Narendra Modi Speech P20 SummitSAAM TV
Published On

Narendra Modi Speech :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. ते दिल्लीच्या यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पी २० परिषदेत उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. दहशतवादाविरुद्ध कठोर पावलं उचलावी लागतील, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

राजधानी दिल्लीत पी २० परिषदेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. भारत लोकशाहीची जननी आहे. काळानुरूप भारताच्या संसदीय प्रक्रियेत सुधारणा झाली आहे. भारताने जी २० परिषदेचे यशस्वी नियोजन केले. निवडणुकांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढला आहे, असे ते म्हणाले. (Latest Marathi News)

मोदी म्हणाले की, 'भारताने जी २० शिखर परिषदेचे आयोजन केले. आता पी २० परिषदेचे आयोजन करत आहे. ही परिषद भारतात होत आहे, जी लोकशाहीची जननी आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश सुद्धा आहे. हे सल्ला-मसलतीसाठी महत्वाचे ठिकाण आहे'

२०१४ मध्ये इतिहासातील सर्वात मोठी निवडणूक

भारतात सार्वत्रिक निवडणूक एका उत्सवासारखी असते. स्वातंत्र्यानंतर भारतात १७ सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. ३०० हून अधिक विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. भारतात केवळ सर्वाधिक निवडणुका होत नाहीत, तर या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात.

२०१४ मधील निवडणूक इतिहासातील सर्वात मोठी निवडणूक होती आणि या निवडणुकीत ६० कोटी नागरिकांनी सहभाग घेतला. २०१९ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढली, तर ६०० हून अधिक राजकीय पक्षांनी सहभाग घेतला, असे मोदी यांनी सांगितले.

Narendra Modi Speech P20 Summit
Jaishankars Security : परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची सुरक्षा वाढली, Y ऐवजी मिळणार Z श्रेणीची सुरक्षा, जाणून घ्या कारण

जी २० देशांच्या वक्त्यांना एकत्र आणणे आणि सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात परिवर्तन, एसडीजीमध्ये तेजी आणणे आदी वेगवेगळ्या विषयांवर लक्ष केंद्रीय करणे हा या शिखर परिषदेचा उद्देश आहे, असेही मोदी म्हणाले.

Narendra Modi Speech P20 Summit
Operation Ajay: सुटकेचा निःश्वास! इस्रायलमधून २१२ भारतीय मायदेशी परतले; मोदी सरकारचं 'ऑपरेशन अजय' सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com