Sharad Pawar News: भाजपच्या प्रवृत्तीला काही लोक बळी पडले; शरद पवार साताऱ्यात बरसले

Sharad Pawar News: 'उलथापालथ करणाऱ्यांना योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत राज्यातील राजकीय भूकंपावर भाष्य करत भाजपवर टीका केली
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSaam tv
Published On: 

सचिन जाधव

Sharad Pawar News: अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांच्या पाठिंब्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या भूमिकेनंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर शक्तिप्रदर्शन करत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी 'भाजपच्या प्रवृत्तीला काही लोक बळी पडले; असं म्हणत राज्यातील राजकीय भूकंपावर भाष्य करत शरद पवारांनी भाजपवर टीका केली. (Latest Marathi News)

शरद पवार यांनी साताऱ्याच्या कराडमध्ये प्रितिसंगमावर मोठं शक्ति प्रदर्शन केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, ' यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी ठिकाणी आपण एकत्रित आलो आहोत. यशवंतराव चव्हाण यांनी सामान्य माणसाचा सहभाग लोकशाही असला पाहिजे. युवाशक्ती जोरावर महाराष्ट्र पूढे नेण्याच काम केलं. आज यशवंतराव नाहीत, पण त्याचे विचार पुढे घेऊन जायच ठरवून पुढे जात आहोत'.

Sharad Pawar News
Maharashtra Politics: शरद पवार अजित पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत; आखली नवी रणनिती

'आज देशात आणि राज्यात माणसांमाणसात संघर्ष कसा होईल असा वर्ग आहे. गेले काही काळात राज्यातील काही ठिकाणी संगमनेर,कोल्हापूर या ठिकाणी जातीय दंगली झाल्या, हे महाराष्ट्राला शोभणार नाही. आपल्याला एका शक्ति विरुद्ध उभा राहिला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar News
Maharashtra Political Crisis: गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुला दगा देण्यात आला; संजय राऊतांचा हल्लाबोल

'चुकीच्या प्रवृत्ती डोक वर काढत आहेत. महाराष्ट्र राज्यात लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या पक्षाला धक्का देण्याच काम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जी उलथापालथ होते, त्यातच आपल्यातील काही सहकार्य बळी पडले आहेत. उलथापालथ करणाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या शक्ती आणि प्रवृत्तीला धक्का देऊ, महाराष्ट्र फिरू, असा इशारा शरद पवारांनी भाजपला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.