Sharad Pawar , Nashik Accident News , Nashik News
Sharad Pawar , Nashik Accident News , Nashik NewsSaam TV

Nashik : नाशकातील अपघातानंतर अजित पवार व्यथित, सरकारला केल्या 'या' सूचना; शरद पवार म्हणाले... (पाहा व्हिडिओ)

आज पहाटेच्या सुमारास नाशकात भीषण अपघात झाला.
Published on

Sharad Pawar : ही दुर्घटना दुर्देवी आहे. राज्य सरकारनं चाैकशीचे आदेश दिले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर अपघाताचं नेमकं कारणं समाेर येईल. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या दुखात आपण सर्वजण सहभागी हाेऊ या अशी भावना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (sharad pawar) यांनी नाशिक (Nashik Accident News Today) बस (bus) दुर्घटनेवर व्यक्त केली. (Tajya Batmya)

ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले नाशिक येथे झालेला बसचा अपघात दुर्देवी आहे. राज्य सरकारनं त्याबाबत चाैकशीचे आदेश दिले आहेत. या चाैकशीनंतर नेमकं कारणं समाेर येईल. दरम्यान या घटनेतील जखमींवर उपचार सुरु आहेत.

Sharad Pawar , Nashik Accident News , Nashik News
Nashik : लाेक देवासारखे धावून आले! अग्नितांडवातून लेकरू बचावलं, आईनं करून दिली अश्रूंना वाट

राज्य सरकारची वैद्यकीय यंत्रणा जखमींना सर्वताेपरी उपचार करण्यासाठी प्रयत्न करती आहे. या दुर्घटनेत जे लाेक मृत्यूमुखी पडले अशा कुटुंबियांच्या दुखात आपण सर्वजण सहभागी हाेऊ या असंही ज्येष्ठ नेते पवार यांनी नमूद केले.

Sharad Pawar , Nashik Accident News , Nashik News
Nashik Bus Fire Updates : नाशकातील अपघातग्रस्तांना केंद्राची मदत जाहीर; पंतप्रधान मोदींचं ट्विट

ब्लॅक स्पाॅट कमी करु - रवींद्र चव्हाण

नाशिक येथील बस दुर्घटना ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. भविष्यात अपघात टाळण्यासाठी महामार्गावरील ब्लॅक स्पॉट किती आहे याची आम्ही माहिती घेऊन हे ब्लॅक स्पॉट कमी करण्याचे प्रयत्न राज्य सरकारने सुरू केले आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

Sharad Pawar , Nashik Accident News , Nashik News
Nashik Bus Accident : नाशकातील अपघातग्रस्त जखमींना छगन भुजबळांनी दिला धीर; मुख्यमंत्र्यांशीही चर्चा

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असताना चिपळूण येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले नाशिक येथे झालेल्या दुर्घटना दुर्देवी आहे. काही जणांचा हाेरपळून मृत्यू झाला. या सर्व गाेष्टींचा तपास केला जाईल. या अपघातामधील जखमींना सरकार सर्वताेपरी मदत करीत आहे.

Sharad Pawar , Nashik Accident News , Nashik News
Kass Pathar : पर्यटकांनी बहरलं 'कास'; पठारावरील फुलं हिरमुसली (पाहा व्हिडिओ)

भरीव मदत द्यायला हवी - अजित पवार

नाशिक येथे झालेल्या अपघातग्रस्तांच्या दुःखात मी सहभागी आहे. अपघातग्रस्तानां जाहीर केले गेलेली मदत तुटपुंजी आहे. त्या लाेकांना भरीव मदत द्यायला हवी अशी भावना विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केली.

Sharad Pawar , Nashik Accident News , Nashik News
Shivendraraje Bhosale : उदयनराजे पुर्वी कुचकं बाेलायचे आता ते..., शिवेंद्रराजेंचे प्रत्युत्तर

अजित पवार म्हणाले काही अपघात असे होतात की दोष कुणाला द्यायचं हे कळतं नाही. सरकारनें रस्ते सुरक्षा बाबत अधिक काळजी घ्यायला हवी. आजच्या अपघातात जे लाेक मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात सहभागी आहे. सरकारनं मदत जाहीर केली आहे परंतु ती भरीव हवी असेही पवार यांनी नमूद केले.

जखमी प्रवासी लवकर बरे व्हावेत - आदित्य ठाकरे

नाशिक जवळ झालेल्या दोन्ही बस दुर्घटना हृदय हेलावून टाकणाऱ्या आहेत. या दुर्दैवी घटनांमध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच सर्व जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन केली आहे.

दरम्यान काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी देखील या दुर्दैवी घटनांमध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांना आदारंजली वाहून सर्व जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी भावना व्यक्त केली आहे.

Edited By - Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com