Nashik : लाेक देवासारखे धावून आले! अग्नितांडवातून लेकरू बचावलं, आईनं करून दिली अश्रूंना वाट

या दुर्घटनेतून बचावलेल्यांनी स्थानिकांचे आभार मानले.
nashik bus accident, nashik, women, mother, kid
nashik bus accident, nashik, women, mother, kidsaam tv

Nashik Bus Accident News : आम्ही झाेपलाे हाेताे. आम्हांला नक्की काय झालं माहित नाही. बसमध्ये गाेंधळ सुरु झाला आणि समाेरचं दृष्य पाहताच थरकाप उडाला. बसच्या बाहेरील लाेक खिडकीतून आम्हांला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत हाेेते. देवा सारखं लाेक धावून आल्यानं आमचा जीव वाचला असे पूजा गायकवाड यांनी नमूद केले. पूजा यांच्याप्रमाणेच बस दुर्घटनेत (accident) ज्या प्रवाशांचा जीव वाचला त्यांच्यावरील प्रसंग एेकताना अंगावर शहारे येत हाेते. (Maharashtra News)

नाशिक शहरात (Nashik Aurangabad highway) आज पहाटेच्या सुमारास खासगी बस आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात मुंबईला जाणाऱ्या सुमारे चाैदा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 35 ते 36 प्रवाशी जखमी झाले आहेत. ही दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत पेटत्या बसमधून प्रवाशांना बाहेर काढले तर बसमधून उड्या मारुन रस्त्यावर पडलेल्या प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ केली. (Nashik Accident News Today)

nashik bus accident, nashik, women, mother, kid
Nashik Bus Fire Updates : नाशकातील अपघातग्रस्तांना केंद्राची मदत जाहीर; पंतप्रधान मोदींचं ट्विट

दरम्यान या दुर्घटनेतून बचावलेल्या पूजा गायकवाड म्हणाल्या वाशिमहून आम्ही मुंबईला चाललाे हाेताे. हे कसं घडलं माहित नाही. आम्ही बसमध्ये झोपलो होतो. आम्हाला मोठा आवाज झाल्यानं जाग आली. लाेक आमच्या मदतीसाठी आले हाेते. त्यांनीच आम्हांला बाहेर काढलं. मला आणि माझ्या भावाला थाेडं लागले आहे.

nashik bus accident, nashik, women, mother, kid
Nashik : 'पेटत्या बसमधून लाेक उड्या मारत हाेते, आम्ही दाेघा-तिघांना वाचवलं, पण...!' (पाहा व्हिडिओ)

दरम्यान विविध माध्यमांशी बाेलताना अनिता चौधरी यांनी त्यांच्या मुलीसह वाचल्यानं प्रथम देवाचे बाहेर आभार मानले. या दुर्घटनेत आमचा जीव वाचल्याने आम्ही नशीबवान ठरलाे आहोत असं अश्रुंना वाट माेकळी करीत त्यांनी नमूद केले.

nashik bus accident, nashik, women, mother, kid
Udayanraje Bhosale : पैशाशिवाय त्यांना दुसरं काही सूचत नाही; उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर

यवतमाळ जिल्ह्यातील प्रवासी धोत्रे यांनी आम्ही झोपेत असताना हा अपघात झाला. त्यामुळे काहीच समजलं नाही. परंतु आगीचे झळ बसल्याने मी झाेपेतून उठलो आणि बसच्या बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळानं त्यात यश आलं. आम्हांला मदत करण्यासाठी अनेकांचे हात पुढं आले असं सांगत असताना धाेत्रेंच्या डाेऴ्यातून पाणी आलं.

Edited By : Siddharth Latkar

nashik bus accident, nashik, women, mother, kid
Anand Remake: आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं..; रुपेरी पडद्यावर पुन्हा येताेय 'आनंद'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com