Nashik : 'पेटत्या बसमधून लाेक उड्या मारत हाेते, आम्ही दाेघा-तिघांना वाचवलं, पण...!' (पाहा व्हिडिओ)

नाशिकजवळच्या नांदूर नाका येथे अपघातानंतर खासगी प्रवासी बसने पेट घेऊन मोठी दुर्घटना घडली.
Nashik , Nashik Accident , Nashik Bus Accident
Nashik , Nashik Accident , Nashik Bus Accidentsaam tv
Published On

- तबरेज शेख

Nashik : आम्हांला बस पेटल्याचे दिसताच बसच्या दिशेनं धाव घेतली. सगळं जळून खाक झाले हाेते. बसमधील लाेक किंचाळत हाेते. लहान मुलांना आम्ही बाहेर काढलं. बसच्या बाहेर काहींनी जीव वाचविण्यासाठी उडया मारल्या हाेत्या. रस्त्यावर देखील माणसं व्हिवळत पडली हाेती. जितक्या लाेकांना धीर देता येईल तितक्या लाेकांना आम्ही धीर देत हाेताे. परंतु सगळं चित्र विदारक हाेते परंतु आम्ही मदत करणारे देखील एकमेकांना धीर देत धैर्याने एकेका माणसाला जमेल तशी मदत करीत हाेताे असं नाशकातील अपघातग्रसातांना मदत करणा-यांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितलं. (Breaking Marathi News)

नाशिक शहरानजकीच्या नांदूर नाका येथे आज पहाटेच्या सुमारास खासगी बस आणि ट्रेलरचा अपघात झाला. त्यानंतर खासगी बसने पेट घेतला. त्यामुळे सुमारे बारा प्रवाशांना आपला जीव गमावावा लागला. या अपघातात (accident) सुमारे तीस प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती समजताच अनेकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. (Maharashtra News)

Nashik , Nashik Accident , Nashik Bus Accident
Nashik Bus Fire Updates : नाशकातील अपघातग्रस्तांना केंद्राची मदत जाहीर; पंतप्रधान मोदींचं ट्विट

या अपघाताबाबत काही प्रत्यक्षदर्शी साम टीव्हीशी बाेलताना म्हणाले हा अपघाताचा स्पाॅट आहे. बसने पेट घेतल्यानंतर अनेकांनी त्यांचे जीव वाचविण्यासाठी बसमधून उड्या मारल्या. सुमारे 50 प्रवासी हाेते बसमध्ये. किमान 25 जण आम्ही जळताना पाहिली. त्यामधील काही जण किंचाळत हाेते. व्हिवळत हाेते. ज्यांना मदत करणं शक्य झालं त्यांना मदत केली. (Nashik Accident News Today)

Nashik , Nashik Accident , Nashik Bus Accident
Udayanraje Bhosale : पैशाशिवाय त्यांना दुसरं काही सूचत नाही; उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर

या अपघातामधील जखमींना घटनास्थळपासून जवळच राहणारे सूर्यवंशी कुटुंबातील सर्व व्यक्ती बसच्या दिशेने धावले. या कुटुंबाने जमेल तशी मदत केल्याचे सांगितले. आम्हांला लहान मुलांच्या किंचाळतानाचा आवाज आला.

Nashik , Nashik Accident , Nashik Bus Accident
Nashik News : नाशिक बस अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर

आम्ही घराबाहेर पडलाे. पाहिलं तर बस पेटली हाेती. काही लाेक मदतीसाठी हाक मारत हाेते. सर्व चित्र पाहून आमची मनं देखील हेलावली. दरम्यान काही मृतांना, जखमींना रिक्षातून पाठविल्याचे मदत करणा-यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com