Nashik Bus Accident : महाराष्ट्रासाठी शनिवारची सकाळ अपघाताच्या एका मोठ्या बातमीने उजाडली. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास नाशकात (Nashik) चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचा भीषण (Bus Accident) अपघात झाला. या अपघातात जवळपास १२ जणांचा आगीत होरपळून दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान, बस अपघातानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Nashik News Today)
बसमध्ये आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवासी
शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चिंतामणी ट्रॅव्हल्सची खासगी बस औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने येत होती. या बसची आसनक्षमता ३० प्रवाशांची असून सुद्धा बसमधून जवळपास ४० हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, बस नाशिकच्या अमृतधाम चौफुलीजवळ आली असता, टाकळीकडून कोळसा भरून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर ट्रकने बसला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की बस ने आयशर ट्रकला सुमारे ५०० ते ६०० मीटर फरफटत नेलं. यावेळी आयशर ट्रकचा डिझेल टॅंक फुटल्याने काही क्षणातच बसने पेट घेतला. अपघातग्रस्त दोन्ही वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या छोटा हत्ती वाहनावर जाऊन धडकल्या बस चालक जागेवरच ठार झाला.
वेळेवर मिळाली नाही मदत
अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही जागृत नागरिकांनी तातडीने १००, नंबर ११२, रुग्णवाहिका १०८, अग्निशमन दला आपत्कालीन व्यवस्था या ठिकाणी संपर्क साधला. परंतू ६ वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही.
घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जखमींना शहर बस मधून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मृतांनाही याच बस मधून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. बराच वेळाने 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
एकूणच या घटनेमध्ये आपत्कालीन व्यवस्था फोल ठरल्याचे दिसून आले. अपघात घडला त्यावेळी जर वेळेवर मदत मिळाली असती, तर बसमधील बऱ्याच प्रवाशांचा जीव वाचला असता, असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.