Nashik Bus Accident : बसला आग नेमकी कशामुळे लागली? अचानक काय घडलं?

धडक इतकी भीषण होती की बसने पेट घेतला. यामध्ये 11 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला याबाबतची माहिती समोर आली आहे.
Nashik Bus Accident Latest News
Nashik Bus Accident Latest News Saam TV
Published On

Nashik Bus Accident Latest News : नाशिकमध्ये (Nashik) आज (शनिवार) सकाळी एक दुर्देवी घटना घडली. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बस ट्रॅव्हल आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की बसने (Bus Accident) पेट घेतला. यामध्ये 11 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला याबाबतची माहिती समोर आली आहे.

बसचा अपघात कसा झाला?

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चिंतामणी ट्रॅव्हल्सची खासगी बस औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने येत होती. बस नाशिकच्या अमृतधाम चौफुलीजवळ आली असता, टाकळीकडून कोळसा भरून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर ट्रकने बसला जोरदार धडक दिली. (Nashik News Today)

Nashik Bus Accident Latest News
Pune Crime News : प्रियकराचा प्रताप! प्रेयसीच्याच घरी मारला 14 लाखांचा डल्ला

धडक इतकी भीषण होती की बस ने आयशर ट्रकला सुमारे 500 ते 600 मीटर फरफटत नेलं. यावेळी आयशर ट्रकचा डिझेल टॅंक फुटल्याने काही क्षणातच बसने पेट घेतला. अपघात ग्रस्त दोन्ही वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या छोटा हत्ती वाहनावर जाऊन धडकल्या बस चालक जागेवरच ठार झाला.

बसमधून उड्या घेतल्याने वाचले प्रवासी

अपघात पहाटेच्या सुमारास झाल्याने बसमधील बरेच प्रवासी गाढ झोपेत होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना आपला जीव वाचविता आला नाही. बसला आग लागताच, अनेक प्रवाशांनी बसच्या खिडकीतून रस्त्यावर उड्या घेतल्या, तर काही प्रवासी हे आगीत होरपळून बाहेर पडले. मात्र त्यांना मदत न मिळाल्याने जागीच गतप्राण झाले. (Maharashtra News)

Nashik Bus Accident Latest News
PFI च्या नावे भाजप आमदारास धमकीचे पत्र; मोदी, शाह, फडणवीसांनाही धमकी

वेळेवर मिळाली नाही मदत

अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही जागृत नागरिकांनी तातडीने 100, नंबर 112, रुग्णवाहिका 108, अग्निशमन दला आपत्कालीन व्यवस्था या ठिकाणी संपर्क साधला. परंतू 6 वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही.

घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जखमींना शहर बस मधून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मृतांनाही याच बस मधून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. बराच वेळाने 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. एकूणच या घटनेमध्ये आपत्कालीन व्यवस्था फोल ठरल्याचे दिसून आले.

मृतांची पटेना ओळख

अपघातातील मयत सर्व दहा जण पुरुष आहेत गंभीररित्या जळालेले असल्याने त्यांची ओळख अद्यापही पटू शकलेली नाही. त्यामुळे या मृतांच्या नातेवाईकांची प्रशासन प्रतीक्षा करीत आहे. तसेच डीएनए चाचणीतून मृतांची ओळख पटविण्यासंदर्भात सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com