School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

School Closed : पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस पडलाय. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आल्यासारखी स्थिती आहे. मुसळधार पाऊस आणखी पुढचे 24 तास राहणार असल्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पालघर जिल्ह्याला पुढच्या 24 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
School Closed :
Palghar schools and colleges holiday due to red alert
Published On
Summary
  • पालघर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी

  • पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना उद्याही सुट्टी जाहीर.

  • गेल्या 24 तासांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस

रुपेश पाटील, साम प्रतिनिधी

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने कमबॅक केलं असून पालघर जिल्ह्यात पावसाने थैमान घातलंय. प्रादेशिक हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी उद्या शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील जिल्ह्यातील पालघर,डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शाळा ,महाविद्यालय, आणि अंगणवाड्यांना उद्याही म्हणजेच शुक्रवारीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Palghar Red Alert: Schools, Anganwadis And Colleges To Remain Closed Tomorrow)

School Closed :
Pune Weather Update: पाऊस येणार की नाही? कसं असेल हवामान? हवामान विभागाने वर्तवला पुढील चार दिवसांचा अंदाज

पालघर जिल्हा आणि गुजरातच्या वलसाड, उंबरगाव परिसरात पावसाने धुमाकूळ घातलाय. गुजरातच्या उंबरगाव येथे तर केवळ 24 तासात तब्बल 906 मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यात देखील पावसाचं रौद्ररुप बघायला मिळत आहे. हवामान विभागाने उद्यासाठी पावसाचा अलर्ट जारी केलाय. जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी अनावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असं जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

दरम्यान प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील त्या-त्या भागातीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्षांना शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.

School Closed :
Protest : काँग्रेसविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजप आमदार, महापौरांसह कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसुचनेनुसार दिनांक 24.7.2026 रोजी पालघर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. परंतु जिल्ह्यांत सदस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. यानुसार जिल्ह्यातीत पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालये यांना दि. 24.07.2026 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू आणि ततासरी तालुक्यातील अंगणवाडी, सरकारी खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना दिनांक 24.07.2026 वार शुक्रवार रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com