

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी
वाढत्या उन्हामुळे सिंधुदुर्गातील शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी
वैभव नाईक यांचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना शाळेच्या वेळेबाबत पत्र
मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढू लागलाय. राज्यातील अनेक भागांत सध्या मुख्यतः कोरडे आणि उष्ण हवामान जाणवत आहे. त्यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळेत बदल करण्यात यावा अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केलीय. याबाबत त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना पत्र लिहिलंय.
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेपासून शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात घेण्यात याव्यात अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केलीय.
दुष्काळाच्या यादीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. सिंधुदुर्गात पाऊस पडत नसल्याने आणि उन्हाच्या झळा तीव्र स्वरूपाच्या झाल्याने तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शाळांची वेळ दुपारच्या सत्रात असल्याने विद्यार्थांना या उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेपासून शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात घेण्यात याव्यात अशी मागणी वैभव नाईक यांनी केलीय.
मुंबईत पुढील ३ दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने एका दिवसापूर्वी व्यक्त केला होता. गेल्या काही दिवसांत मुंबईत तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने उकाडा वाढलाय. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान दमट आणि तीव्र उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. ठाणे आणि मुंबईत ७ ऑक्टोबरपासून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तापमान आणि आर्द्रतेचा परिणाम तापमान आणि आर्द्रतेतील अचानक वाढीचा शरीराच्या तापमान नियंत्रण प्रणालीवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. दिवसा तीव्र सूर्यप्रकाश आणि रात्री सौम्य गारवा यामुळे हवेत आर्द्रता वाढलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.