School Holiday: आज १२ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सुट्टी; 'या' ठिकाणी शाळा राहणार बंद

School Holiday Today 7th February For ZP Election: आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. यामुळे अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
School Holiday
School HolidaySaam tv
Published On
Summary

आज १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीसाठी मतदान

मतदानाच्या ठिकाणी शाळांना सुट्टी

कामगारांना मतदानासाठी १-२ तासाठी जाण्याची मुभा

आज राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानाला सुरुवात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणी शाळा बंद असणार आहे.

School Holiday
ZP Election : पुण्यात मतदानाआधीच राडा, अजित पवारांच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला, शेकडो लोक रस्त्यावर

आज १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. पुणे, बारामती, पिंपरी चिंचवड, धाराशिव,सांगली, परभणी, धाराशीवसह अनेक ठिकाणी मतदान होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी लागणार आहे. मतदानामुळेच आज शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

या ठिकाणी शाळा बंद

पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ, मुळशी, शिरुर, हवेली, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर आणि खेड या तालुक्यात तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता मतदान होणार आहे. निवडणूक होत असल्याने मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

School Holiday
ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

खाजगी कंपन्यांमधील आस्थापना, दुकाने, हॉटेल, अन्य गृहे आणि नाट्यगृहे या ठिकाणी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे शक्य नाही त्यामुळे २-३ तासांची सवलत देण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान करता यावे, यासाठी ही सुट्टी देण्यात आली आहे. तसेच मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

School Holiday
Public Holiday : पुढच्या गुरूवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com