7/12 Utara: सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

Maharashtra Farmers: राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्याचे नाव सातबारामध्ये नाही अशा शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला.
7/12 Utara: सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
Good News For FarmersSaam Tv
Published On
  • सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

  • फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

  • २.३१ लाख शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीचा मार्ग मोकळा

  • महाराष्ट्रात सातबारा उताऱ्यावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांची नोंद होणार

गणेश कवडे, मुंबई

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. फडणवीस सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला. सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. राज्यातील २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा होणार आहे. सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना १५ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना महसूलमंत्र्यांनी दिलं.

राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल २ लाख ३१ हजार शेतकऱ्यांचा 'ॲग्रीस्टॅक' मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे.

7/12 Utara: सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पहिला हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार, फडणवीसांची मोठी घोषणा

यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. मंत्रालयात महसूल मंत्र्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर, महसूल व सहकार व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

7/12 Utara: सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या यादीत नाव दिसलं नाही, बँकेतून घरी येताच शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?

- राज्यामध्ये सध्या तब्बल २ लाख ३१ हजार शेतकऱ्यांचे 'ॲग्रीस्टॅक' निघत नसल्याची गंभीर बाब समोर आली होती.

- यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या. राज्यात सुमारे ५० हजार शेतकरी मयत आहेत, ज्यांच्या नोंदी अद्ययावत नाहीत.

- १० हजार प्रकरणांमध्ये जमीन वडिलांच्या नावे असून, मुलाचे नाव अद्याप सातबारावर लागलेले नाही. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या 'कबुलायतदार' जागांवर सरकारचे नाव लावण्यात आले आहे.

- परिणामी, अशा शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नाही आणि घेतलेल्या कर्जाला कर्जमाफीचा लाभही मिळत नाही.

7/12 Utara: सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होणार ७ हजार कोटी रुपये, तारीख आली समोर

- एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात १,२०७ शेतकऱ्यांचे 'फार्मर आयडी' अद्याप निघालेले नाहीत. तर राज्यातील ही संख्या २ लाख ३१ हजार आहे.

- या सर्व अडचणींची दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे शेतकरी आहेत, परंतु त्यांचे नाव सातबारा किंवा इतर अधिकारात नाही, अशा शेतकऱ्यांच्या जमिनीची सर्व कागदपत्रे गोळा करून सहकार विभागाकडे पाठविण्यात येतील, असे आदेश दिले.

- यासाठी एक स्वतंत्र फॉरमॅट तयार करून सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून १५ दिवसांत अहवाल मागविण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

- लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबतचे अंतिम आदेश निर्गमित केले जातील.

7/12 Utara: सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या यादीत नाव दिसलं नाही, बँकेतून घरी येताच शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com