Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पहिला हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार, फडणवीसांची मोठी घोषणा

Shruti Vilas Kadam

पहिला हप्ता कधी जमा होणार?

पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ८ आणि ९ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होणार आहे. पहिल्या हप्ता वितरित करण्यात आला आहे. तांत्रिक अडचणींमुळे ४ ऑगस्टची नियोजित तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

Farmer Loan Waiver

सरकारकडून किती निधी मंजूर?

योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने ५ हजार २९ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. हा निधी सहकार आयुक्तांच्या माध्यमातून वितरित करण्यात आला आहे.

Farmer Loan Waiver

किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

पहिल्या टप्प्यात ई-केवायसी पूर्ण केलेल्या सुमारे ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ मिळणार आहे.

Farmer Loan Waiver

किती रुपयांपर्यंत कर्जमाफी?

योजनेअंतर्गत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे.

Farmer Loan Waiver

ई-केवायसी पूर्ण असणे महत्त्वाचे

योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Farmer Loan Waiver

सहकार आणि कृषी विभागाची तयारी पूर्ण

४ ऑगस्टची तारीख तांत्रिक कारणांमुळे हुकल्यानंतर आता सहकार आणि कृषी विभागाने पहिल्या हप्त्याच्या वितरणासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

Farmer Loan Waiver

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

कर्जमाफीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील निधी कर्ज खात्यात जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक भारातून काही प्रमाणात दिलासा मिळेल.

Farmer Loan Waiver

Noodles Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलस्टाईल टेस्टी नूडल्स, वाचा सोपी रेसिपी

Noodles Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा