Noodles Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलस्टाईल टेस्टी नूडल्स, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

२०० ग्रॅम नूडल्स, १ कप कोबी, १ गाजर, १ शिमला मिरची, १ कांदा, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, २ टीस्पून सोया सॉस, १ टीस्पून चिली सॉस, १ टीस्पून व्हिनेगर, २ टेबलस्पून तेल, मीठ आणि मिरपूड.

Noodles Recipe | GOOGLE

नूडल्स उकळून घ्या

एका भांड्यात पाणी उकळून त्यात थोडे मीठ आणि काही थेंब तेल घाला. नूडल्स शिजवून गाळून थंड पाण्याखाली धुवा, त्यामुळे त्या चिकटणार नाहीत.

Schwan Noodles Recipe | Saam Tv

भाज्या परतून घ्या

कढईत तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट परता. त्यानंतर कांदा, गाजर, कोबी आणि शिमला मिरची मोठ्या आचेवर २ ते ३ मिनिटे परतून घ्या.

Veg Hakka Noodles Recipe

सॉस मिसळा

परतलेल्या भाज्यांमध्ये सोया सॉस, चिली सॉस आणि व्हिनेगर घालून चांगले मिसळा. चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला.

Veg Hakka Noodles Recipe

नूडल्स एकजीव करा

उकडलेले नूडल्स भाज्यांमध्ये घालून हलक्या हाताने टॉस करा. सर्व मसाले आणि सॉस नूडल्सला व्यवस्थित लागतील याची काळजी घ्या.

Hakka Noodles Recipe | Google

अधिक चवदार बनवण्यासाठी

आवडीनुसार स्प्रिंग ऑनियन, चिली फ्लेक्स, तिळाचे तेल किंवा पनीर, मशरूम, टोफू यांचा वापर करून नूडल्सची चव अधिक वाढवू शकता.

Hakka Noodles Recipe | Google

गरमागरम सर्व्ह करा

तयार नूडल्स स्प्रिंग ऑनियनने सजवून गरमागरम सर्व्ह करा. टोमॅटो सॉस किंवा चिली सॉसबरोबर खाल्ल्यास त्याची चव आणखी खुलते.

Noodles Recipe

Cham Cham Recipe: घरीच बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट चमचम, वाचा सोपी रेसिपी

Cham Cham Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा