मोठी बातमी! फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात PSI ला जामीन, पण बदनेपुढे ठेवल्या ३ अटी, 5 महिन्यांनी येणार तुरुंगाबाहेर

PSI Gopal Badne Bail In Phaltan Doctor Suicide Case: फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पीएसआय गोपाळ बदनेला 5 महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने तीन कडक अटी घालत जामीन दिला असून या प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे.
PSI Gopal Badne granted bail by court after five months in custody in the Phaltan doctor suicide case.
PSI Gopal Badne granted bail by court after five months in custody in the Phaltan doctor suicide case.Saam Tv
Published On

ओंकार कदम, साम टीव्ही

डॉक्टर आत्महत्या प्रकरणात गेल्या पाच महिन्यांपासून अटकेत असलेला पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने (वय ३५, मूळ रा. चांदापूर, ता. परळी, जि. बीड, हल्ली के रा. बिरदेवनगर, जाधववाडी, ता. फलटण) याला कोल्हापूर सर्किट बेंच न्यायालयाने ५० हजारांच्या वैयक्तिक बॉण्डवर गुरुवारी जामीन मंजूर केला. फलटण येथे २३ ऑक्टोबर २०२५ रोजी एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.

PSI Gopal Badne granted bail by court after five months in custody in the Phaltan doctor suicide case.
राज्यातील सरकारी कंत्राटदार संपावर जाणार, ७ एप्रिलपासून रस्ते, पूल आणि विकासकामे ठप्प होणार

संबंधित महिला डॉक्टरने मृत्यूपूर्वी तिच्या हातावर पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर (वय २९, रा. बनकर निवास लक्ष्मीनगर, फलटण) या दोघांची नावे लिहून त्यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे नमूद केले होते. त्यामुळे फलटण पोलिसांनी गोपाळ बदनेसह प्रशांत बनकरला अटक केली. PSI बदने गेल्या पाच महिन्यांपासून अटकेत होता. त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंच न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सरकारी पक्ष आणि बदनेच्या वकिलांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पीएसआय गोपाळ बदने याचा जामीन मंजूर केला.

PSI Gopal Badne granted bail by court after five months in custody in the Phaltan doctor suicide case.
Ashok Kharat Case: खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला, आमच्याकडे सर्व पुरावे, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

न्यायालयाकडून बदनेला 'या' तीन अटी

१) कोणत्याही प्रकारे फिर्यादी पक्षाच्या साक्षीदारांवर दबाव आणणार नाही आणि फिर्यादी पक्षाच्या पुराव्यामध्ये फेरफार करणार नाही.

2) सत्र न्यायालयाने सूट दिली नसल्यास, सुनावणीच्या प्रत्येक तारखेला हजर राहिले पाहिजे. तपास अधिकाऱ्याकडे आधार आणि पॅन कार्ड, सविस्तर पत्ता, फोन नंबर आणि दोन जवळच्या नातेवाईकांची माहिती सादर करावी.

3)कोणत्याही अटींचा भंग केल्यास जामीन रद्द करण्यात येईल. अशा अटी बदनेला घालण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com