Phaltan Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदारासोबतच आमदाराचे नाव, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप; म्हणाले...

Ambadas Danve On Satara Doctor Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाविषीयी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी माजी खासदार आणि आमदारावर गंभीर आरोप केले आहेत.
Phaltan Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदारासोबतच आमदाराचे नाव, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप; म्हणाले...
Ambadas Danve Saam TV
Published On

Summary -

  • सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट

  • शिवसेना नेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

  • माजी खासदार रणजित निंबाळकर आणि आमदार सचिन कांबळे यांच्यावर दानवेंनी केले आरोप

  • डॉक्टरवर राजकीय आणि पोलिस दबाव होता असा आरोप दानवेंनी केला

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिला डॉक्टरने पोलिस आणि राजकीय दबावाखाली येऊन टाकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात मोठा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत माजी खासदार रणजित निंबाळकर, त्यांचा भाऊ अभिजीत निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार सचिन कांबळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे सर्वजण चुकीची कामं करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अंबादास दानवे यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये आत्महत्या केलेल्या डॉक्टरला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, 'फलटण आत्महत्या प्रकरणातील आरोपी पळून जातात आणि मग मुख्यमंत्री 'कडक' कारवाईचे आदेश देतात. जन्मापासून संघर्ष करत पुढे आलेली मराठवाड्यातील कन्येचे अशी आत्महत्या हे 'रक्षक हेच भक्षक' झाल्याचे द्योतक आहे. जनसेवेचे व्रत घेतलेल्या महिलेला असा मानसिक छळ सोसावा लागतो आणि त्याचा असा दुर्दैवी अंत होतो.. याची सखोल चौकशी करण्यासाठी सातारा जिल्ह्याबाहेरील अधिकाऱ्यांची स्वतंत्र चौकशी समिती सरकारने स्थापन करावी, अशी आमची मागणी आहे. बाकी गुन्हेगार बेभान... सरकार वेगवान...सुरूच आहे!' या पोस्टद्वारे त्यांनी सरकारवर देखील निशाणा साधला.

फेसबुकवर त्यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी या प्रकरणावरून साताऱ्यातील आमदार आणि माजी खासदारावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, 'वैद्यकीय अधिकारी महिलेने स्वत:चे जीवन संपवले. तिने हातावर सुसाईट नोट लिहिली. पोलिसावर आरोप आहेत आणि राजकीय दबावाविषयी देखील तिने लिहिले आहे. सातत्याने या सर्व भागात चौकशी केली असता हे लक्षात आले की राजकीय दबाव आणि पोलिसांचा दबाव या वैद्यकीय अधिकाऱ्यावर होता. या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे वेगवेगळे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि सर्टिफिकेट देण्याचे काम होते. या सगळ्यामध्ये बऱ्याचदा राजकीय लोक, पोलिस अधिकारी लोक पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही तरी बदल करावा, काही तरी राजकीय हेतूने, कुणाला तरी वाचवण्यासाठी किंवा कुणाला अडकवण्यासाठी अशापद्धतीने दबाव या वैद्यकीय अधिकाऱ्यावर आणत होते. वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांनी दबाव आणल्याचे या प्रकरणावरून लक्षात येते.'

Phaltan Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदारासोबतच आमदाराचे नाव, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप; म्हणाले...
Doctor Death Case Satara: ही आत्महत्या नाही… व्यवस्थेने केलेला खून! फलटणच्या डॉक्टर मृत्यूचं गूढ वाढतंय|VIDEO

अंबादास दानवे यांनी माजी खासदार आणि आमदारावर गंभीर आरोप करत सांगितले की, 'या सगळ्यामध्ये महिला वैद्यकीय अधिकारी सहज आत्महत्या करेल अशातला भाग नाही. शिकलेली वैद्यकीय अधिकारी मजबूत मनाची निश्चित असते. असे असताना या महिला डॉक्टरने आत्महत्या केली. जी माहिती आम्ही घेतली त्यानुसार याठिकाणी प्रचंड राजकीय दबाव सर्व शासकीय अधिकाऱ्यांवर आहे. इथे सत्ताधारी पक्षाचे काही लोकं आहेत, माजी खासदार आहेत, आमदार आहेत सचिन कांबळे. सर्वात महत्वाचं म्हणजे अभिजीत निंबाळकर नावाची व्यक्ती या ठिकाणी सर्व शासकीय कारभरात सातत्याने हस्तक्षेप करत असते. वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अडकवणं, स्वत:च्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाचवणं ही काम केली जात आहेत. त्यांच्याकडून प्रशासनाचा वापर करून घेतला जात आहे.'

Phaltan Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदारासोबतच आमदाराचे नाव, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप; म्हणाले...
Satara Doctor Death : डॉक्टर तरूणी दिवाळीला घरी येणार होती, त्याआधीच तिच्या मृत्यूची बातमी पोहोचली, कुटुंबीयांचा आक्रोश

महिला डॉक्टरने पोलिसांकडे तक्रार करून देखील कारवाई करण्यात आली नव्हती असा आरोप दानवे यांनी केला. ते म्हणाले की, 'मागच्या काळात महाडिक नावाचे पीआय इथ होते. या महाडिकांकडे या डॉक्टर महिलेने जुलै महिन्यात तक्रार केली होती. या सगळ्या त्रासाविषयी कल्पना दिली असताना देखील महाडिकांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. तिचा अर्ज केराच्या कुंडीत टाकला. हे महाडिक आता नंदुरबारमध्ये डीवायएसपी झाले आहेत. त्यांना हातकड्या घातल्या पाहिजेत. सरकार भाजपचे असताना, गृहमंत्रीपद देवेंद्रजी चालवत असताना पोलिस दल असे काम करत आहे आणि सत्ताधारी पक्षाची लोकं अशी कामं करत आहेत.'

Phaltan Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदारासोबतच आमदाराचे नाव, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप; म्हणाले...
Satara: खाकीवर पुन्हा डाग! पोलिसावर बलात्काराचा आरोप, साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या, आतापर्यंत काय काय घडलं?

त्याचसोबत, 'अशी देखील माहिती आहे की, माजी खासदारांच्या पीएनेसुद्धा यामध्ये फोन केला आणि दबाव टाकला. म्हणूनच महिला डॉक्टरचा जो जीव गेला आहे हा या व्यवस्थेने घेतलेला जीव आहे. प्रशासकीय व्यवस्थेने, पोलिसांनी घेतलेला जीव आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या बरबटलेल्या राजकारणाने घेतलेला जीव आहे. असा आरोप दानवे यांनी केला आहे. तसंच, 'या महिला डॉक्टरला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. अधिकारी या जिल्ह्यातले नसावेत बाहेरच्या जिल्ह्यातले महिला अधिकारी आणून याप्रकरणाची चौकशी व्हावी. संबंधितांना फासावर लटकवावं.' अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

Phaltan Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदारासोबतच आमदाराचे नाव, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप; म्हणाले...
Satara Doctor Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई, आरोपीच्या मुसक्या आवळल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com