अडवल्याचा राग डोक्यात गेला, भरचौकात तरुणांचा राडा; शिवीगाळ करत पोलिसावर जीवघेणा हल्ला
कांदिवलीत नाकाबंदी दरम्यान पोलिसांवर हल्ला
सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद, दोन आरोपी अटकेत
पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की, उपनिरीक्षक जखमी
समताननर पोलिसांचा पुढील तपास सुरू
कांदिवली पूर्वेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाकाबंदीदरम्यान, पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकावर कारवाई रोखण्यासाठी सहा जणांनी पोलिसांना अडथळा निर्माण करत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही घटना आकुर्ली रोडवरील बिग बाजार सबवे परिसरात रात्री उशिरा घडली. तक्रारदार पोलीस हवालदार सिद्धार्थ किनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक अजय रमेश बामणे हे मद्यप्राशन करून आले होते. यादरम्यान, कारवाई सुरू असताना त्याचे सहकारी विद्या सोनावणे, विजया भट, वर्षा बामणे आणि गणेश बामणे यांनी एकत्र येऊन पोलिसांना अडवले. पोलिसांना अरेरावी केली.
यावेळी पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की करण्यात आली, तसेच उपनिरीक्षक गरड यांना नखाने ओरखडे काढत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेनंतर भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 132, 189(2), 189(3), 190, 115(2), 352, 125, 281 तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत कलम 181, 184, 185 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अजय बामणे आणि गणेश बामणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास समतानगर पोलीस करत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.