हा हात नीट पाहा....याचं हातामुळे एका आत्महत्येचं गूढ उलगडलयं...फलटणच्या हॉटेलमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं गळफास घेऊन आत्महत्या केली... आणि हातावर लिहली राज्याला हादरवून सोडणारी सुसाईड नोट....माझ्या मरण्याचं कारण पोलिस निरक्षक गोपाल बदने आहे. ज्याने माझ्यावर 4 वेळा रेप केला आणि प्रशांत बनकरने मागचे 4 महिने माझा शारीरिक, मानसिक छळ केला.
या नोटमध्ये महिला डॉक्टरनं थेट दोघांची नाव घेतली ज्यातला एकजण फलटणमध्ये काम करणारा पोलीस उपनिरिक्षक आहे.तर दुसरा आहे तिच्या घरमालकाचा मुलगा...मात्र अशा पध्दतीने स्वतःचं आयुष्य संपवण्याची वेळ या महिला डॉक्टरवर का आली...
खर तर या त्रासाबद्दल तिने चार महिन्यांपूर्वीच फलटणच्या पोलीस उपअधीक्षकांना पत्र लिहून याची माहिती दिली होती आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती .मात्र तिच्या या तक्रारीची दखलच घेण्यात आली नाही...जिवंत असताना ज्या महिला डॉक्टरची तक्रारही नोंदवून घेतली नाही ते पोलीस प्रशासन तिच्या आत्महत्येनंतर मात्र कामाला लागलं...
या दोन फरार आरोपींचा शोध जरी पोलिसांनी सुरू केलेला असला तरी यात एका होतकरू डॉक्टरचा मात्र जीव गेलाय...आता प्रश्न येतो तो पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलावा म्हणून महिला डॉक्टरवर कुणी दबाव टाकला..फोन करणारे खासदार कोण होते..या दबावाला जुमानलं नाही म्हणून तिच्यावर अत्याचार केले गेले का..पोलीस उपअक्षीकांनी यावर वेळीच कारवाई का नाही केली..पत्रात पोलीसांची नावं असूनही पोलीसांना वाचवण्याचा प्रयत्न का केला......असे अनेक प्रश्न या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं निर्माण झालेत..यातल्या काहीची उत्तर मिळतील काहींची उत्तर बनवली जातील..ही आत्महत्या नाहीये तर एका मुर्दाड यंत्रणेनं एक होतकरू डॉक्टरचा केलेला खून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.