Satara: खाकीवर पुन्हा डाग! पोलिसावर बलात्काराचा आरोप, साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या, आतापर्यंत काय काय घडलं?
Satara Women Doctor Death CaseSaam Tv

Satara: खाकीवर पुन्हा डाग! पोलिसावर बलात्काराचा आरोप, साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या, आतापर्यंत काय काय घडलं?

Satar Female Doctor Case: साताऱ्यातील फलटणमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केली. फलटणमधील एका हॉटेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपवले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह आणखी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on

Summary -

  • साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या

  • फलटण शासकीय रुग्णालयात होती कार्यरत

  • आत्महत्येपूर्वी हातावर लिहिली होती सुसाईड नोट

  • पोलिस उपनिरीक्षक आणि घरमालकाच्या मुलावर बलात्काराचा आरोप

  • बीडमधील मूळगावात डॉक्टरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

साताऱ्यामध्ये महिला डॉक्टराने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांवर बलात्कार, शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप करत या महिला डॉक्टराने टोकाचे पाऊल उचलले. साताऱ्यातील फलटण येथील शासकीय रुग्णालयात ही महिला डॉक्टर कार्यरत होती. तिने गुरूवारी फलटणमधीलच एका हॉटेलमधील खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहिली होती त्यावर तिने दोन पोलिस आणि घरमालकाच्या मुलावर गंभीर आरोप केले होते.

बलात्काराचा आरोप -

पोलिस उपनिरीक्षक आणि घरमालकाच्या मुलाने माझा शारीरिक आणि मानसिक छळ करून माझ्यावर ४ वेळा बलात्कार केल्याचे या महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर लिहिले होते. या घटनेमुळे फक्त साताराच जिल्हा नाही तर राज्यात खळबळ उडाली. ही महिला डॉक्टर मुळची बीडची होती. ती फलटणमधील शासकीय रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्याचे काम करत होती. या डॉक्टरवर पोलिसांकडून वारंवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता, असा आरोप तिचे काका आणि आत्याच्या मुलाने केला आहे.

Satara: खाकीवर पुन्हा डाग! पोलिसावर बलात्काराचा आरोप, साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या, आतापर्यंत काय काय घडलं?
Satara News: डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक होणार? मंत्री शंभुराज देसाईंनी दिली महत्वाची माहिती|VIDEO

पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे निर्देश दिले. त्यांनी संबंधित पोलिसांचे तात्काळ निलंबन करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याच्याविरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. या महिला डॉक्टरच्या मृतदेहावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांसह नातेवाईकांना हंबरडा फोडला.

Satara: खाकीवर पुन्हा डाग! पोलिसावर बलात्काराचा आरोप, साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या, आतापर्यंत काय काय घडलं?
Satara Doctor Death : डॉक्टर तरूणी दिवाळीला घरी येणार होती, त्याआधीच तिच्या मृत्यूची बातमी पोहोचली, कुटुंबीयांचा आक्रोश

नेमकं काय घडलं?

अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी या प्रकरणाविषयी सांगितले की, संबंधित महिला डॉक्टर ही फलटण तालुक्यातील एका शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत होती. ती संशयित आरोपी प्रशांत बनकर याच्या घरात राहात होती. बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास तिने फलटण येथील एका हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी रूम बुक केली होती. सकाळी सात वाजता हॉटेल कर्मचाऱ्यांनी चहा, नाश्त्यासाठी रूमचा दरवाजा ठोठावला. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दुपारी दोन वाजता जेवणासाठी कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. तेव्हाही काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे हॉटेल प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली.

Satara: खाकीवर पुन्हा डाग! पोलिसावर बलात्काराचा आरोप, साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या, आतापर्यंत काय काय घडलं?
Satara News : डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी महत्वाची अपडेट; पोलिसांकडून आरोपी PSI गोपाल बदनेवर मोठी कारवाई

हातावर लिहिलं आत्महत्येचे कारण -

घटनेची माहिती मिळताच फलटण शहर पोलिसांनी हॉटेल गाठले. दरवाजा उघडला जात नसल्यामुळे पोलिसांनी हॉटेल प्रशासनाच्या मदतीने दरवाजा उघडला. या वेळी महिला डॉक्टरने गळफास घेतल्याचे दिसून आले. फलटण शहर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. त्यानंतर नातेवाइकांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. डॉक्टरच्या हातावर एक नोट लिहिली होती. त्यामुळे तिने पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांचे नाव लिहिले होते. मृतदेहाची पाहणी करताना हातावर काही तरी लिहिले असल्याचे समोर आले. त्यामध्ये उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांचे नाव लिहिले होते. दोघांनी गेल्या चार महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक छळ तसंच बलात्कार केल्याचे डॉक्टरने हातावर लिहिले होते.

Satara: खाकीवर पुन्हा डाग! पोलिसावर बलात्काराचा आरोप, साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या, आतापर्यंत काय काय घडलं?
Satara News : साताऱ्याच्या डॉक्टर महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला, मृत्यूचं कारण आलं समोर

तक्रार करूनही कारवाई नाही -

महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने चार महिन्यांपूर्वी कामांमध्ये वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरलेल्या एका संशयित व्यक्तीला पात्र ठरविण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने, पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील, साहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे या पोलिस अधिकाऱ्याकडून वारंवार दबाव येत असल्याची लेखी तक्रार फलटणच्या पोलिस उपअधीक्षकांकडे केल्याची माहिती समोर आली आहे. याच त्रासाला ती कंटाळली होती असे देखील सांगितले जात आहे.

Satara: खाकीवर पुन्हा डाग! पोलिसावर बलात्काराचा आरोप, साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या, आतापर्यंत काय काय घडलं?
Doctor Death Case Satara: ही आत्महत्या नाही… व्यवस्थेने केलेला खून! फलटणच्या डॉक्टर मृत्यूचं गूढ वाढतंय|VIDEO

पोलिसांसह राजकीय दबाव -

महिला डॉक्टरच्या भावाने सांगितले की, माझी बहीण दोन वर्षांपासून या रुग्णालयात कार्यरत आहे. एक वर्षापासून शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी, चुकीचा देण्यासाठी तिच्यावर राजकीय आणि पोलिसांचा दबाव येत होता. याबाबत तिने तिच्या डॉक्टर असलेल्या बहिणीला सांगितले होते. परंतू एवढा गंभीर त्रास असेल असे आम्हाला वाटले नव्हते. या त्रासाबाबत तिने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली होती. परंतु त्यावर कारवाई झाली नाही. माहिती अधिकारात तिने माहिती मागूनही दिली गेलेली नाही. तिने हातावर संशयितांची नावे लिहिली आहेत. त्या सर्वांविरोधात कठोर कारवाई करावी.

Satara: खाकीवर पुन्हा डाग! पोलिसावर बलात्काराचा आरोप, साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या, आतापर्यंत काय काय घडलं?
Satara: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसासह एका व्यक्तीविरोधात गुन्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com