Satara: शहापूरच्या इंजिनिअर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, बायको अन् मेहुण्याने कट रचत क्रूरपणे संपवलं

Satara Tahasildar Death Case: साताऱ्यामध्ये शहापूरच्या इंजिनिअरचा अपघातामध्ये मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचे तपासातून उघड झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.
Satara: शहापूरच्या इंजिनिअर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, बायको अन् मेहुण्याने कट रचत क्रूरपणे संपवलं
Satara Tahasildar DeathSaam Tv
Published On
  • शहापूरचे इंजिनिअर लक्ष्मण मंडले यांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

  • सुरुवातीला अपघात वाटणारी घटना घातपात असल्याचे तपासातून समोर

  • इंजिनिअरची बायको आणि मेहुण्याने रचला हत्येचा कट

  • कराड शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत प्रकरणाचा उलगडा केला

ओंकार कदम, सातारा

ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या इंजिनअरच्या मृ्त्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या इंजिनिअरचा मृत्यू अपघाती नसून घातपात असल्याचे तपासातून उघड झाले आहे. बायको आणि मेहुण्याने कट रचत इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं. लक्ष्मण मंडले असे या इंजिनिअरचे नाव होते. साताऱ्यातील कराडमध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती उघड झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मृदू व जलसंधारण विभागात अभियंता असलेल्या लक्ष्मण मंडले यांचा अपघाती मृत्यू झाला. पहाटे साडेपाच वाजता कराड शहरातील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलसमोर एका भरधाव कारने त्यांना उडवले होते. या घटनेनंतर घटनास्थळावरून कराचालकाने कारसह पलायन केले होते. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या इंजिनिअरचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला होता.

Satara: शहापूरच्या इंजिनिअर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, बायको अन् मेहुण्याने कट रचत क्रूरपणे संपवलं
Pune Crime : व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, धक्कादायक कारण उघड

कार चालकाने पलायन केल्याने हा अपघात की घातपात असा संशय व्यक्त केला जात होता. अखेर १२ तासांच्या आत कराड शहर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला. हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले आहे. या घातपातात इंजिनिअर लक्ष्मण मंडले यांची बायको सुरेखा आणि मेहुणा संग्राम या दोघांचा समावेश असल्याचे उघड झाले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे. अभियंता लक्ष्मण मंडले हे कराड तालुक्यातील मनव गावचे असून त्यांनी महाबळेश्वर कराड येथे काम केले आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Satara: शहापूरच्या इंजिनिअर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, बायको अन् मेहुण्याने कट रचत क्रूरपणे संपवलं
Beed Crime: लाच घेताना पोलिसाला अटक, शेतकऱ्याकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडलं; पोलिस दलात खळबळ

दरम्यान, बारामतीमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. टेम्पोच्या चाकाखाली चिरडून दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात नीरा- मोरगाव राज्य महामार्गावर झाला. सोमेश्वर मंदिराच्या दिशेने तिघे जण दुचाकीवरून जात होते. त्यांना टेम्पोने धडक दिली. या अपघाताचा तपास बारामती पोलिस करत आहेत. या अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला.

Satara: शहापूरच्या इंजिनिअर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, बायको अन् मेहुण्याने कट रचत क्रूरपणे संपवलं
Crime: लग्नात रक्तरंजित थरार! आवडतं गाणं न वाजवल्यानं वऱ्हाडी संतापले, नवरदेवाच्या काकाची चाकूने वार करत हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com