सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने हातावरती सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली आहे. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावे व दोषींवर कठोर शासन व्हावे अशी मागणी आता भाजपा आमदार सुरेश धस यांनी केली असून तसेच महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
डॉक्टरांच्या आई वडिलांनी केवळ तीन एकरावरती तिला डॉक्टर केले आणि तिच्या आत्महत्याच्या म्हणजे सुसाईड नोटमध्ये हातावरती लिहिलेले जे कोणी पोलीस उपनिरीक्षक त्याच्यानंतर तो बनकर हे तर आरोपी झालेच पाहिजेत.
परंतु तिच्या तक्रारीची दखल न घेणारे उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदार असतील हे सगळेच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत. याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे.आणि हे जे सगळे आरोपी आहेत. हे सगळेच्या सगळे फासावरती लटकले पाहिजेत असं माझं मत आहे.
फास्टट्रॅकवरती तर हा खटला चाललाच पाहिजे. परंतु एसआयटीची स्थापना झाली पाहिजे. पोटाला चिमटा घेऊन आमचे लोक ऊस तोडून लेकीबाळीला शिकवतात आणि त्याचा जर असे काही लोक गैरफायदा घेत असतील तर त्यांना चपराक बसली पाहिजे. इथून पुढे दुसरी डॉक्टर ही होता कामा नये याची संपूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे असं माझं मत आहे.
तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही बीडचे लोक पोटाला चिमटा घेऊन काबाडकष्ट करून, ऊसतोडून लेकरं उच्चशिक्षित करत आहेत. बीडची म्हणून कोणी हिणवत असेल तर ते सगळ्यात मोठ दुर्दैव आहे. आमचे बीडचे लोक बुद्धिमान आहेत आणि सर्व क्षेत्रात पुढे आहेत. या घटनेत जे कोणी खासदार त्यांचे पी ए असतील ते सुद्धा यात आरोपी झाले पाहिजेत. त्या लेकरावरती अत्याचार होत असताना तिने तक्रार दिली होती. तिची दखल न घेणारे जे जे कोणी असतील ते या प्रकरणी दोषी आहेत. मी त्या महिला डॉक्टरच्या बाजूने ठामपणे उभा आहे.असे आमदार सुरेश धस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.