Phaltan Doctor Case: हातावरील सुसाईड नोट दुसऱ्यानेच लिहिली, महिला डॉक्टरच्या बहिणीचा दावा; फलटण बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट
Summary -
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
डॉक्टरच्या बहिणीने केले धक्कादायक दावा
डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोट दुसऱ्यानेच लिहिली
डॉक्टरवर खोटे पोस्टमार्टम रिपोर्ट बनवण्यासाठी दबाव आणला जात होता
योगेश काशिद, बीड
सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर लिहिलेली सुसाईड नोटबाबत तिच्या कुटुंबीयांनी मोठा खुलासा केला आहे. डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोट ही कुणी तरी लिहून ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये खाडाखोड केली आहे. तिची ही रायटिंग नसून प्रकरणाच्या पाठीमागे आणखी कोणीतरी आहे याची कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी डॉक्टरच्या बहिणीने केली आहे.
आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या बहिणीने गंभीर आरोप केला आहे. ती म्हणाली की, 'आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टरने सुसाईड नोट लिहून ठेवली असेल. मात्र ती गायब केली आहे. ती देखील समोर आली पाहिजे. त्यामध्ये सर्वच लोकांची नाव असतील. या प्रकरणांमध्ये राजकारण येता कामा नये. आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे.'
तसंच, 'या प्रकरणांमध्ये तिला वारंवार दबाव आणून खोटे पोस्टमार्टम रिपोर्ट बनवून घेतले जात होते किंवा बनवण्यासाठी भाग पाडले जात होते. मात्र ती चुकीचं काम न करता चांगलं काम करत असताना कुणीतरी तिला दबाव टाकून चुकीचं काम करण्यास भाग पाडत होते.' असे देखील तिने सांगितले. जे कुणी यामागे आहे त्यांना शासन झाले पाहिजे, अशी मागणी डॉक्टरच्या कुटुंबियांनी केली आहे.
आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या वडिलांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, 'माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. ज्यांनी माझ्या मुलीला संपवला आहे त्यांना फाशी झाली पाहिजे. दरम्यान, साताऱ्याच्या फलटण शासकीय रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गुरूवारी आत्महत्या केली. फलटणमधील हॉटेलमध्ये तिने गळफास घेत आयुष्य संपवले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

