

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. सातार जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उदयसिंह उंडाळकर यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेकडून दीपक चव्हाण यांची निवड झाली आहे. भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपचा काटा काढला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडीनंतर जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जयकुमार गोरे यांची नाराजी स्पष्टपणे माध्यमांसमोर पाहायला मिळाली. जयकुमार गोरे यांनी सांगितले की, 'अध्यक्ष हा महायुतीचा झालेला आहे. उदयसिंह उंडाळकर यांना चेअरमन म्हणून माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या कालखंडामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बँक चालावी अशी माझी अपेक्षा आहे. ही निवड होत असताना नाराजीचा विषय येत नाही ज्यांचं बहुमत आहे त्यांचा अध्यक्ष झालेला आहे.'
जयकुमार गोरे यांनी अध्यक्ष निवडीबाबत सूचक विधान केले याची आता चर्चा होऊ लागली आहे. ते म्हणाले की, 'कोणी कशाचा वाचपा काढला हा आजचा विषय नाही जिल्हा परिषदेची निवडणूक वेगळी होती. त्यात आम्ही वेगळे लढलो होतो ही निवडणूक महायुती म्हणून आम्ही लढलो होतो आणि महायुती म्हणून जिल्हा बँकेमध्ये आम्ही एकत्र आहोत. बाकी सगळ्या गोष्टी ऑफ द रेकॉर्ड आहेत त्या संदर्भात अधिक बोलणं उचित नाही. कोणतीही निवडणूक अंतिम नसते आगे आगे देखो होता है क्या. फॉर्मुल्याच्या चर्चेमध्ये मी आजपर्यंत कधीही नव्हतो महायुतीच्या चर्चेमध्ये मी कधीही नव्हतो. महायुतीच्या चर्चेमध्ये आदरणीय शिवेंद्र राजे होते त्यांचा काय फॉर्मुला ठरला आहे हे शिवेंद्रराजेंनाच माहीत असेल ना महायुतीने मला मतदान केलंय त्यामुळे काही विषय येत नाही.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.