भाजपच्या बड्या नेत्याचा दारूण पराभव, शंभूराज देसाईंचा विजय, जयकुमार गोरेंनीही गुलाल उधळला, सातारा बँकेत कोण-कोण जिंकलं?

Satara District Central Cooperative Bank election results : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला, तर जयकुमार गोरे यांनीही विजय मिळवला.
Shambhuraj Desai defeats Satyajitsinh Patankar
Shambhuraj Desai defeats Satyajitsinh Patankar
Published On: 

Shambhuraj Desai defeats Satyajitsinh Patankar, Jaykumar Gore wins Satara District Bank election : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अटीतटीच्या लढतींमध्ये दिग्गजांनी बाजी मारली आहे. एकूण ९७.९२ टक्के एवढे विक्रमी मतदान झालेल्या या निवडणुकीत २१ पैकी १२ जागांवर तुफान चुरस पाहायला मिळाली. सातारा शहरातील जरंडेश्वर नाका परिसरातील मतमोजणी केंद्रावर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला.

शंभूराज देसाईंचा विजय

पाटणच्या अत्यंत चर्चेच्या ठरलेल्या लढतीमध्ये साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (शिवसेना) यांनी आपले पारंपारिक प्रतिस्पर्धी आणि भाजप नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा १२ मतांनी पराभव केला. शंभूराज देसाई यांना ५८ मते तर सत्यजित पाटणकर यांना ४६ मते मिळाली. तब्बल ४२ वर्षानंतर देसाई गटाचा या ठिकाणी विजय झाला.

Shambhuraj Desai defeats Satyajitsinh Patankar
काँग्रेस आमदाराचे दीर्घ आजाराने निधन, राजकारणात शोककळा, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

नाईक-निंबाळकर घराण्यातील लढत

फलटणमध्ये नाईक-निंबाळकर घराण्यातील लढतीत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विजय मिळवला. त्यांनी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा ११ मतांनी पराभव केला. संजीवराजेंना ७१ मते तर समशेरसिंहांना ६० मते मिळाली.

जयकुमार गोरे विजयी:

माण तालुक्यात भाजप नेते अन् मंत्री जयकुमार गोरे यांनी ५३ मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला. त्यांनी राष्ट्रवादीचे मनोज पोळ (१४ मते) आणि शिवसेना नेते शेखर गोरे (७ मते) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

Shambhuraj Desai defeats Satyajitsinh Patankar
सांगलीत रोहित पाटलांना जोरदार धक्का, पडळकरकरांनी गुलाल उधळला, संजयकाका पाटलांचा विजय; सुमनताई पाटलांचा १ मताने पराभव

ईश्वर चिठ्ठीने सुनील माने विजयी:

कोरेगाव तालुक्यात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे सुनील माने (४५ मते) आणि भाजपचे सुनील खत्री (४४ मते) यांच्यात अटीतटीची लढत झाली. एक मतपत्रिका बाद झाल्यामुळे दोन्ही उमेदवारांमध्ये लढत टाय झाली. अखेर ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली आणि नशिबाची साथ मिळून राष्ट्रवादीच्या सुनील माने यांना विजयी घोषित करण्यात आले.

Shambhuraj Desai defeats Satyajitsinh Patankar
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे थडगे बांधले, अमित शाह-राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटीवर राऊत भडकले

कराड सोसायटी गट :

माजी मंत्री स्व. विलासकाका उंडाळकर पाटील यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी १०० मते मिळवून धनाजी पाटील (४५ मते) यांचा मोठा पराभव केला.

जावळी सोसायटी गट :

भाजपचे ज्ञानेश्वर रांजणे ३८ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीच्या विठ्ठल गोळे (८ मते) यांचा पराभव केला.

खंडाळा सोसायटी गट:

राष्ट्रवादीचे अजय भोसले २८ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी भाजपच्या संजीव गाढवे (२१ मते) यांचा पराभव केला.

महाबळेश्वर सोसायटी गट:

राष्ट्रवादीच्या रुपाली राजपुरे ८ मते मिळवून विजयी ठरल्या. त्यांनी शिवसेनेच्या संजय मोरे (४ मते) यांचा पराभव केला.

औद्योगिक विणकर मतदारसंघ:

भाजपचे चंद्रकांत जाधव ७९ मते मिळवून विजयी झाले.

अनुसूचित जाती-जमाती गट :

शिवसेनेचे दीपक प्रल्हाद चव्हाण यांनी ६१८ मते मिळवून मोठा विजय मिळवला.

भटक्या विमुक्त जमाती गट:

भाजपचे अर्जुन काळे ३४९ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार सुनील वाघ (२८४ मते) यांचा पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.