Satara: ९ वीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; शाळेची तयारी करताना जागीच प्राण सोडले

satara 14 year old student cardiac arrest: साताऱ्यामध्ये १४ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शाळेची तयारी करत असताना ही घटना घडली.
Satara: ९ वीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; शाळेची तयारी करताना जागीच प्राण सोडले
Satara NewsSaam Tv
Published On
  • साताऱ्यातील ठोसेघर येथे १४ वर्षीय नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

  • हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती

  • क्लासला जाण्याची तयारी करत असताना अचानक बेशुद्ध पडला

  • रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले

ओंकार कदम, सातारा

साताऱ्यात नववीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. साताऱ्याच्या ठोसेघरमध्ये ही घटना घडली. ठोसेघर येथून शिक्षणासाठी दररोज पहाटे क्लासला जाणाऱ्या नववीचा विद्यार्थ्याच्या अचानक मृत्यूमुळे सर्वांना धक्का बसला. तो आदर्श माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता. अवघ्या १४ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. नेहमीप्रमाणे घराबाहेर पडण्यापूर्वीच स्वप्नीलवर काळाने घातला. शालेय वयातील उमद्या विद्यार्थ्याच्या अशा अकाली जाण्याने ठोसेघर परिसरात आणि विद्यालयात तीव्र हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील ठोसेघर येथे राहणाऱ्या स्वप्निल नामदेव आवकीरकर (वय १४) याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तो आदर्श माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता नववीतील विद्यार्थी होता. शनिवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास स्वप्निल आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला होता. त्यावेळी अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ ठोसेघर येथून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Satara: ९ वीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; शाळेची तयारी करताना जागीच प्राण सोडले
Satara Fort : वाईजवळील ऐतिहासिक वैभव, सह्याद्रीच्या कुशीत लपलाय 'हा' भव्य किल्ला

डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत स्वप्निलचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. स्वप्निलचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच त्याच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. स्वप्निल अभ्यासू, शांत, नम्र आणि होतकरू विद्यार्थी म्हणून शिक्षक व मित्रपरिवारात परिचित होता. शिक्षणाची आवड असल्याने तो दररोज आपला भाऊ श्रेयस आवकीरकर याच्यासोबत सकाळी साताऱ्यात क्लासला जात होता.

Satara: ९ वीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; शाळेची तयारी करताना जागीच प्राण सोडले
Satara Tourism: कास पठाराजवळील 'हे' मनमोहक ठिकाण माहितीये का? पावसाळ्यात खुलतं स्वर्गीय सौंदर्य

सकाळी ७ ते ९ या वेळेत क्लास पूर्ण करून राजवाडा येथून सकाळी ९.३० वाजताच्या बसने तो ठोसेघरला परत येत असे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता तो शाळेणमध्ये जात होता. शनिवारी पहाटे तो क्लासला जाण्यासाठी तयारीत करत होता. पण त्यावेळी नियतीने त्याच्यावर घाला घातला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाला. पोटच्या मुलाला गमावल्यामुळे त्याच्या आई-वडिलांचे रडून रडून बेहाल झाले.

Satara: ९ वीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; शाळेची तयारी करताना जागीच प्राण सोडले
Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com