
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड उर्फ 'आका'चा पाय दिवसेंदिवस अधिक खोलात जाताना दिसत आहे. या हत्याप्रकरणात सीआयडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातील एकेक तपशील आता बाहेर येत आहेत.वाल्मिक कराड याने खंडणी मागितल्याची कुठलीही तक्रार आलेली नाही असा युक्तीवाद केला जात होता. मात्र आता याला छेद देणारा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे.
वाल्मीक कराडने सरपंच हत्या प्रकरणा नंतर आपल्या तीन आयफोन मधला डेटा डिलीट केला. मात्र एसआयटीने हा डाटा रिकव्हर केला आहे. एका व्हिडिओमध्ये सुदर्शन घुले अवादा कंपनीकडे स्पष्टपणे दोन कोटींची खंडणी मागताना दिसतोय. त्यात त्याने कराडचे नाव घेत खंडणी मागितली. या व्हिडीओतील संभाषणच या आरोपपत्रात आहे.पाहूया कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेला संवाद...
सुदर्शन घुले - 100 लोक सांभाळण्याऐवजी एक कराड सांभाळा. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. वाल्मिक अण्णांनी मागितलेले 2 कोटी रुपये देऊन टाका.
तुमचे काम सुरु होईल. गेल्यावेळी मी आलो होतो तेव्हा तुम्ही पोलिसांकडे तक्रार दिली होती. माझ्याविरोधात तुम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली. ही गोष्ट वाल्मिक अण्णांना समजली आहे. ते तुमच्यावर संतापले आहेत. त्यामुळे वाल्मिक अण्णांची मागणी पूर्ण करा अन्यथा तुमची कामं बंद केली जातील.
एकीकडे कराड भोवतीचा फास आवळला जात असतानाच त्याची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये मोठ्या महागड्या आठ गाड्या आहेत.
मर्सिडीज बेन्झ MH44z0007 - किंमत 50 ते 80 लाख
बीएमडब्ल्यू Mh44Ac1717 70 लाख ते 3 कोटी
इनोव्हा टोयोटा Mh44AB1717 20 ते 27 लाख
फोर्ड इंडेवर Mh44T0777 41 ते 60 लाख
अशोक लेलँड Mh44 u07700 28 ते 30 लाख
सरपंच संतोष देशमुख हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर सगळ्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडमधील कराड गँगची पाळमुळं खणून काढली जात आहेत. या आरोपींना कधी शिक्षा होणार याकडे राज्याचं लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.